Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विकी कौशलसाठी बॅड न्यूज ठरला Good News! दोन दिवसांच्या कमाईत अभिनेत्याच्या सुपरहिट ‘उरी’ला टाकलं मागे

11

मुंबई– विकी कौशल, एमी विर्क आणि तृप्ती डिमरी स्टारर ‘बॅड न्यूज’ रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर चर्चेचा विषय ठरला आहे. बॅड न्यूजचा थिएटरमधील पहिलाच दिवस विकी कौशलच्या कारकिर्दीची मोठी ओपनिंग ठरली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना विशेषत: कौटुंबिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवरील चांगलाच दिसून येतोय. आनंद तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाची कमाई पहिल्या दिवशी ८.३ कोटी रुपये होती, तर दुसऱ्या दिवशी ती थेट १७.४७ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे विकी कौशलसोबतच सिनेमाच्या इतर टीमलाही आनंद गगनात मावेनासा झालाय.Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘Bad News’ ने दुस-या दिवशी जवळपास ९.७५ कोटींची कमाई करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. विक्की कौशलच्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ला पहिल्याच दिवशी कमाईला मागे टाकत दुसऱ्या दिवशीही जोरदार कमाई केलेली पाहायला मिळते.

Dharmaveer 2: धर्मवीर २ चा एक डायलॉग नेटीझन्सचा लॉजिकल सवाल, मविआ सरकार स्थापनेवेळी दिघे साहेब होते का?
‘बॅड न्यूज’ची स्टोरी

विकी कौशलचे तौबा तौबा हे गाणे केवळ भारतातच नव्हे तर देशाविदेशातही टॉप करत होते. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात सिनेमा विषयी आकर्षण होते. शिवाय ट्रेलर रिलीज झाल्यावर त्यातील धमाल कॉमेडी पाहून उत्सुकता आणखी शिगेला पोहचलेली.

Tharla Tar Tag 21 July: ‘एक घरवाली एक बाहर वाली’अर्जुनची तारांबळ, अखेर तो क्षण आलाच सायलीची खऱ्या आईशी भेट झालीच पण…
चित्रपटाची कथा हेटेरोपॅटर्नल सुपरफेकंडेशनच्या दुर्मिळ घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये तृप्ती डिमरीच्या जुळ्या मुलांचे दोन वडील असतात – विकी कौशल आणि एमी विर्क.

‘बॅड न्यूज’चे २ दिवसांचे कलेक्शन

‘बॅड न्यूज’चे बजेट काय आहे, हे अद्याप समोर आलेले नाही, मात्र अवघ्या दोन दिवसांत सिनेमाने १८.०५ कोटींचा व्यवसाय केला आहे. ही प्राथमिक आकडेवारी असून खरी कमाई काही काळानंतर कळेल. दुसऱ्या दिवशी चित्रपटाचा एकूण कलेक्शन २६.८१% होते. मॉर्निंग शोमध्ये १३.३९ %, दुपारच्या शोमध्ये २६.११ % आणि संध्याकाळच्या शोमध्ये ३०.२१ % प्रेक्षकांची गर्दी होती जी रात्रीच्या शोमध्ये ३७.५१ % पर्यंत वाढली.
विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो शेवटी सॅम बहादूर या सिनेमात दिसलेला. हा सिनेमा थिएटरमध्ये अपेक्षित कमाई करु शकला नव्हता. पण त्याचा नुकताच रिलीज झालेला बॅडन्यूज उत्तम कमाई करताना दिसतोय.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.