Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
iPhone SE 4 बद्दलची माहिती टिपस्टर आइस युनिव्हर्सनं दिली आहे. त्यानुसार या फोनमध्ये 48-एमपीचा सिंगल रियर कॅमेरा मिळेल. अर्थात ड्युअल रियर कॅमेऱ्याची शक्यता नाकारण्यात आली आहे. यात 6.06 इंचाचा डिस्प्ले मिळेल. नवीन एसई मॉडेलमध्ये होम बटनच्या ऐवजी फेस आयडी मिळेल तसेच बेजल्स देखील पातळ मिळतील. चला जाणून घेऊया याची संभाव्य लाँच डेट.
या आठवड्याच्या सुरुवातीला एका लीकमध्ये सांगण्यात आले होते की फोनमध्ये iPhone 16 सारखी डिजाइन असेल, ज्यात ड्युअल रियर कॅमेरा सिस्टम मिळेल. याआधी आलेल्या रिपोर्ट आणि CAD रेंडर्स मधून वेगळी माहिती समोर आली आहे, ज्यात आगामी आयफोन एसई 4 मध्ये सिंगल रियर कॅमेरा असल्याचं सांगण्यात आलं होतं. प्रसिद्ध टिपस्टर आइस युनिव्हर्सनं iPhone SE 4 मध्ये मिळणाऱ्या संभाव्य स्पेसिफिकेशनची माहिती दिली आहे, ज्यामुळे ड्युअल कॅमेरा मिळणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.iPhone Price Drop: आयफोन 15च्या किंमतीत मोठी घट, नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी
आइस युनिव्हर्सच्या माहितीनुसार, आगामी iPhone SE 4 मॉडेलमध्ये 48-मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा असेल. याची स्क्रीन साइज 6.06 इंच असल्याचं सांगण्यात आलं आहे. जी iPhone SE 3 च्या 4.7-इंचाच्या डिस्प्ले पेक्षा मोठी आहे. परंतु यात अजूनही 60 हर्ट्झ रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळू शकतो, जो अनेकांना कमी वाटेल, कारण बाजारात अनेक मिडरेंज अँड्रॉइड फोन 90 ते 120 हर्ट्झ पर्यंत रिफ्रेश रेटसह येतात.
डिव्हाइसमध्ये अॅप्पलचा लेटेस्ट A18 बायोनिक चिप मिळण्याची शक्यता आहे. लीकमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की आगामी आयफोन एसई मॉडेल 6GB किंवा 8GB LPDDR5 रॅमसह येऊ शकतो. यात एक मॉडेम देखील असेल, जो अॅप्पल किंवा क्वॉलकॉम कडून घेतला जाईल.
आगामी आयफोन एसई 4 मध्ये अॅल्युमिनियम साइड फ्रेम मिळेल. परंतु फोन जुन्या SE मॉडेलमधील आयकॉनिक होम बटन आणि जाड बेजल्सला मागे टाकेल आणि नव्या iPhone लाइनअप सारख्या डिजाइनसह येईल. रिपोर्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की यात फेस आयडी मिळेल, जो जुन्या मॉडेलमधील टच आयडीची जागा घेईल.
संभाव्य किंमत
लीक मधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की आगामी iPhone SE 4 मध्ये चार्जिंगसाठी iPhone 15 सीरीज प्रमाणे USB-C पोर्ट मिळेल. किंमत पाहता, रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की iPhone SE 4 ची किंमत $499 (सुमारे 42,000 रुपये) आणि $549 (सुमारे 46,000 रुपये) दरम्यान असण्याची शक्यता आहे. हा फोन मार्च आणि मे 2025 दरम्यान लाँच होऊ शकतो.