Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Google Play Store: गुगल करणार मोठी कारवाई; लाखो मोबाईल ॲप्सची होणार सुट्टी, 31 ऑगस्टपर्यंत मुदत निश्चित

14

Google कमी दर्जाच्या आणि काम न करणाऱ्या ॲप्सवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये लाखो डाउनलोड्स असलेल्या अनेक लोकप्रिय ॲप्सवर बंदी घातली जाऊ शकते. यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत निश्चित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
गुगल प्ले स्टोअरवर असे अनेक ॲप्स आहेत, जे सध्या काम करत नाहीत. तसेच, काही ॲप्स अतिशय खराब दर्जाचे असतात. यामुळे युजरलाॲप वापरतांना अनेक समस्या येतात. अशा कारणांमुळे Google आपल्या प्लॅटफॉर्मवरून हजारो ॲप्स काढून टाकू शकते. यामध्ये लो क्वालिटी किंवा वापरले न जाणारे असेच ॲप्स असतील. सध्या Google Android युजर्ससाठी Google Play ॲप अधिक सुरक्षित बनवण्याच्या दृष्टीने काम करत आहे, ज्या अंतर्गत गुगलने ३१ ऑगस्टची अंतिम मुदत निश्चित केली आहे. गुगलच्या नवीन प्लॅननुसार गुगल मोठ्या प्रमाणावर अँड्रॉइड ॲप्स रिलीज करण्याच्या तयारीत आहे.

31 ऑगस्ट 2024 डेडलाईन

गुगलने असे ॲप्स काढून टाकण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२४ ही अंतिम मुदत दिली आहे. वास्तविक, कंपनीने स्पॅम आणि मिनिमम फंक्शनॅलिटी पॉलिसी (किमान कार्यक्षमता धोरण) अपडेट केली आहे, जेणेकरून ॲपची गुणवत्ता आणि त्याचा युजर एक्स्पेरियन्स सुधारता येईल. Google च्या नवीन धोरणामध्ये, कमी कन्टेन्ट असलेले आणि योग्यरित्या डिझाइन न केलेले ॲप्स काढून टाकले जातील. यामध्ये केवळ टेक्स्ट ॲप्स, सिंगल वॉलपेपर ॲप्स यांचा समावेश आहे. हे ॲप्स योग्य प्रकारे इन्स्टॉल होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच इंस्टॉल करताच ते क्रॅश होतात.

2023 मध्ये हटविले 2.28 ॲप्स

Google ने म्हटले आहे की, ॲप हा स्थिर रिस्पॉन्स देणारा आणि एक उत्कृष्ट युजर एक्स्पेरियन्स असावा. एकंदरीत, ॲप स्टोअरवरील लिस्टेड ॲप्समध्ये चांगली क्वालिटी आणि योग्य युजर एक्स्पेरियन्स असावा. यापूर्वी, 2023 मध्ये, Google ने धोरण उल्लंघनाच्या आरोपाखाली Google Play Store प्लॅटफॉर्मवरून 22.8 लाख ॲप्स काढून टाकले होते. तसेच, 2,00,000 ॲप्सचे सबमिशन रद्द करण्यात आले होते.

Google ने दिला 6 आठवड्यांचा वेळ

गुगलच्या या नव्या प्रक्रियेचा प्रभाव लाखोंच्या संख्येने डाउनलोड झालेल्या अनेक लोकप्रिय ॲप्सवर दिसून येतो. Google ने डेव्हलपरना त्यांचे ॲप स्टॅंडराईज्ड करण्यासाठी 6 आठवड्यांचा वेळ दिला आहे, ज्या अंतर्गत ॲपला युजर फ्रेंडली आणि सेफ बनणे आवश्यक आहे.

तुमच्या फोनवरून काढून टाका ‘हे’ ॲप

सरकारच्या सोशल मीडिया मेसेजनुसार CashExpand-U Finance Assitant हे ॲप तुमचे नुकसान करू शकते. रिपोर्टनुसार, या ॲपमध्ये परदेशी कनेक्शन आहे, ज्याचा वापर ऑनलाइन फसवणूक किंवा डेटा चोरीसाठी केला जाऊ शकतो. सरकारच्या इशाऱ्यानंतर हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहे. सरकारच्या सूचनांचे पालन करून, Google आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून असे धोकादायक ॲप्स काढून टाकणे बंधनकारक आहे.

नंदिता रामेश्वर थोरात

लेखकाबद्दलनंदिता रामेश्वर थोरातनंदिता थोरात हिने मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझममध्ये मास्टर्स केले आहे. तिला पब्लिक रिलेशन्स, न्युज रायटिंग, फीचर रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, एडिटिंग आदी मीडिया संबंधित कामांचा जवळपास १० वर्षांचा अनुभव आहे. जनरल फीचर्स, फायनान्स फीचर्स नंतर ती आता टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. कामाव्यतिरिक्त तिला वाचनाची विशेष आवड असून हिंदी सिनेमा बघणे तसेच त्यावर समीक्षण नोंदवणेही आवडते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.