Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

UPI ID Deactivation: फोन चोरीला गेलाय; होईल खाते रिकामे, त्वरित ‘असे’ करा यूपीआय आयडी डिलीट

27

How to delete UPI ID: फोन चोरीला गेला असेल तर तुमचा UPI आयडी खाली दिलेल्या स्टेप्सनुसार डिलीट करा. यानंतर तुम्ही तुमच्या खात्यातील पैसे वाचवू शकता. अन्यथा चोर तुमचे खाते रिकामे करू शकतात आणि तुम्ही अडचणीत येऊ शकता. यासाठी, तुम्ही तुमचा UPI आयडी स्वतः कसा डिलीट करू शकता ते येथे जाणून घ्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजकाल कॅश पेमेंटपेक्षा ऑनलाईन पेमेंट करण्याला जास्त प्राधान्य दिले जाते.जवळ कॅश सांभाळण्याची रिस्क नको म्हणूनही कदाचित असेल पण गेल्या काही वर्षांत ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे हे नक्की. यामुळे Google Pay, Phone Pay, Paytm आणि UPI अशा ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. परंतु या ऑनलाईन कॅश पेमेंट प्रोसेसमध्येही काही रिस्क असतातच. जसे की, यदाकदाचित तुमचा फोन चोरीला गेल्यास किंवा तुम्ही एखाद्या ऑनलाईन हॅकिंगला बळी पडल्यास तुमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील रक्कम एका झटक्यात साफ होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचे ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म तातडीने ब्लॉक करता आले पाहिजे. जेणेकरून तुमचा पैसा सुरक्षित राहील. . तुम्ही तुमचा UPI आयडी कसा बंद करू शकता हे आज तुम्हाला सांगत आहोत ते वाचा आणि तुमचा फोन चोरीला गेल्यास लगेच या स्टेप्स फॉलो करा.

UPI आयडी असा ब्लॉक करा

यासाठी सर्वप्रथम 02268727374 किंवा 08068727374 या दोनपैकी कोणत्याही एका क्रमांकावर कॉल करा. रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर तक्रार नोंदवा, येथे OTP मागितल्यावर, सिम कार्ड आणि डिव्हाइस हरवण्याचा पर्याय निवडा. यानंतर तुम्ही कस्टमर केअरशी कनेक्ट व्हाल. येथे तुम्ही तुमचा फोन चोरीला गेल्याची माहिती देऊन लगेच UPI आयडी ब्लॉक करू शकता.

पेटीएम यूपीआय आयडी कसा ब्लॉक करायचा

  • पेटीएम यूपीआय आयडी ब्लॉक करण्यासाठी प्रथम पेटीएम बँकेच्या हेल्पलाइन नंबर -01204456456 वर कॉल करा.
  • येथे लॉस्ट फोनचा पर्याय निवडा.
  • यानंतर, पर्यायी क्रमांक (म्हणजे ज्या क्रमांकावरून तक्रारीवर प्रक्रिया केली जात आहे) एंटर करा, त्यानंतर जो क्रमांक हरवला तो टाका.येथे सर्व डिव्हाईसेसमधून Logout चा पर्याय निवडा.
  • यानंतर, पेटीएम वेबसाइटवर जा आणि ‘24×7 हेल्प’ पर्याय निवडा, येथे तुम्ही Report a Fraud किंवा Messege Us पर्याय सिलेक्ट करू शकाल.
  • हे केल्यानंतर पोलिस रिपोर्ट आणि आवश्यक तपशील द्यावा लागेल. तपशीलांची पडताळणी केल्यानंतर, तुमचे पेटीएम खाते तात्पुरते बंद केले जाईल.

त्याचप्रमाणे, तुम्ही इतर प्लॅटफॉर्मवरील व्यवहारदेखील गरज पडेल तसे ब्लॉक करू शकता. तथापि, प्रत्येक प्लॅटफॉर्मची प्रक्रिया थोडी वेगळी असू शकते. UPI
ID आणि नंबर ब्लॉक केल्यानंतर, जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जा आणि फोन हरवल्याबद्दल FIR नोंदवा.

नंदिता रामेश्वर थोरात

लेखकाबद्दलनंदिता रामेश्वर थोरातनंदिता थोरात हिने मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझममध्ये मास्टर्स केले आहे. तिला पब्लिक रिलेशन्स, न्युज रायटिंग, फीचर रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, एडिटिंग आदी मीडिया संबंधित कामांचा जवळपास १० वर्षांचा अनुभव आहे. जनरल फीचर्स, फायनान्स फीचर्स नंतर ती आता टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. कामाव्यतिरिक्त तिला वाचनाची विशेष आवड असून हिंदी सिनेमा बघणे तसेच त्यावर समीक्षण नोंदवणेही आवडते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.