Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Made in India iPhone: आयफोन असेंबली मध्ये भारताची घौडदौड; जगातील 14 टक्के युनिट बनतात देशात, सर्वेक्षणातून माहिती समोर

10

IPhone Assembling: ॲपलने जागतिक स्तरावर असेंबल केलेल्या एकूण आयफोनपैकी १४ टक्के आयफोन भारतात असेंबल केले आहेत. यासह जागतिक इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत भारताच्या क्रमवारीत चार स्थानांनी वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात, अमेरिकेबरोबरची मोबाईल फोनसह इलेक्ट्रॉनिक्सची निर्यात वाढून 5.7 अब्ज डॉलर झाली, जी 2022-23 मध्ये 2.2 अब्ज डॉलर होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे की, 2023-24 या आर्थिक वर्षात ॲपलने जागतिक स्तरावर असेंबल केलेल्या एकूण आयफोनपैकी 14 टक्के आयफोन भारतात असेंबल केले आहेत.संपूर्ण आर्थिक वर्षात Apple ने भारतात 14 अब्ज डॉलर किमतीचे आयफोन असेंबल केले आहेत. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राचा जागतिक बाजारपेठेतील हिस्सा 3.7 टक्के होता. या काळात या उद्योगाने भारताच्या जीडीपीमध्ये चार टक्के योगदान दिले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात भारतात 8.22 लाख कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने आणि 1.9 लाख कोटी रुपयांची उत्पादने निर्यात करण्यात आली.

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मोबाईल फोन सेगमेंटमध्ये सर्वाधिक वाढ

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मोबाईल फोन सेगमेंटने सर्वाधिक वाढ अनुभवली आहे आणि अमेरिकेतील निर्यात 2022-23 या आर्थिक वर्षात 2.2 बिलियन अमेरिकन डॉलरवरून आर्थिक वर्ष 2024 मध्ये 5.7 बिलियन अमेरिकन झाली आहे. .

जागतिक इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत भारताचा वाटा मोठा

“जागतिक इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत भारताचा वाटा 2018 मधील 0.63 टक्क्यांवरून 2022 मध्ये 0.88 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. अशा प्रकारे, जागतिक इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत भारताची निर्यात (रँकिंग) 2018 मधील 28 व्या
स्थानावरून 2022 मध्ये 24 व्या स्थानावर पोहोचली आहे. भारताच्या व्यापारी वस्तूंच्या निर्यातीमधील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाटा आर्थिकवर्ष 2019 मधील 2.7 टक्क्यांवरून आर्थिक वर्ष 2024 मध्ये 6.7 टक्क्यांपर्यंत वाढला ,” असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ

सर्वेक्षणात असे नोंदवले गेले आहे की, भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राने 2014 पासून लक्षणीय वाढ अनुभवली आहे. या क्षेत्रातील आर्थिक वर्ष 2022 मध्ये जागतिक बाजारपेठेच्या अंदाजे 3.7 टक्के वाटा भारताचा आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे देशांतर्गत उत्पादन लक्षणीय वाढून 8.22 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, तर आर्थिक वर्ष 2023 मध्ये निर्यात 1.9 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी भारत हे एक आकर्षक ठिकाण बनले आहे आणि देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादन क्षमता प्रस्थापित झाली आहे.

पीएलआय योजनेची महत्वाची भूमिका

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात, स्मार्टफोन उत्पादन आणि असेंबलीवर लक्ष केंद्रित केले जाते. सरकारची पीएलआय योजना कंपन्यांना आकर्षित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. कारण यात कर सूट आणि सबसिडी समाविष्ट आहेत. भारतातील देशांतर्गत स्मार्टफोनच्या मागणीत वाढ हा देखील कंपन्यांमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे.

मोबाईल फोन उत्पादनातील कर्मचारी संख्येत वाढ

आर्थिक वर्ष 2017 ते आर्थिकवर्ष 2022 या कालावधीत मोबाईल फोनच्या उत्पादनातील प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे, विशेषत: महिला ब्लू-कॉलर कामगारांना याचा फायदा झाला आहे. फेज 1 आणि फेज 2 दरम्यान मजुरी आणि पगार 317 टक्क्यांनी वाढला आहे. असे सर्वेक्षणात म्हटले आहे. .

नंदिता रामेश्वर थोरात

लेखकाबद्दलनंदिता रामेश्वर थोरातनंदिता थोरात हिने मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझममध्ये मास्टर्स केले आहे. तिला पब्लिक रिलेशन्स, न्युज रायटिंग, फीचर रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, एडिटिंग आदी मीडिया संबंधित कामांचा जवळपास १० वर्षांचा अनुभव आहे. जनरल फीचर्स, फायनान्स फीचर्स नंतर ती आता टेक्नोलॉजी विषयी लिहीत आहे. कामाव्यतिरिक्त तिला वाचनाची विशेष आवड असून हिंदी सिनेमा बघणे तसेच त्यावर समीक्षण नोंदवणेही आवडते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.