Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Pune Rain : डोळ्यासमोर ‘हंबरडा’ फोडतायं तरी काही करता येईना, पुण्यात गोठा पाण्याखाली, 11 जनावरांनी गमावला जीव
नेमकं काय घडलं ?
वारजे स्मशानभूमी परिसरात नदीपत्राजवळ असणाऱ्या एका गोठ्यात जनावरे बांधण्यात आली होती. रात्री अचानक जास्त प्रमाणात पावसाला सुरवात झाली. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि पाणी हळू हळू गोठ्यात शिरू लागलं. यामध्ये 11 जनावरांना जीव गमवावा लागला आहे. तर तीन ते चार जनावरांनी तोंडवर करून आपला जीव वाचवला आहे.
पुण्यासाठी रेड अलर्ट जारी
पुणे जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती पाहता पुढच्या ४८ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून पुढील ४८ तास पुण्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, पुणे जिल्ह्यातील धोकादायक असणारे पर्यटन स्थळ पुढील आदेशापर्यंत बंद असणार आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातील सगळे धोकादायक पूलही बंद असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली.
एनडीआरएफची टीम मदतीला
पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साठल्याने सिंहगड रस्ता डेक्कन परिसरातील सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने पुणे महापालिकेने लष्कराकडे मदत मागितली होती, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी दिली. एनडीआरएफच्या दोन टीम एकता नगरकडे रवाना झाल्या आहेत. तेथे अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी या टीम पाठवल्या आहेत.
अजित पवारांनी मदत व बचाव कार्याचा घेतला आढावा
उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला आहे. नैसर्गिक संकटात सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धरणातील पाणी पातळीचा आढावा घेतला. पुरामुळे प्रभावित असलेल्या भागांतील लोकांना अन्न आणि पाणी देण्याचे निर्देश अजित पवारांकडून देण्यात आले आहेत.