Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Supplementary Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या नव्या तारखा…

8

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशासह राज्यभरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. दहावी-बारावीचे २६ जुलै रोजी होणारे पेपर रद्द करण्यात आले असून त्याच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीचे हे पेपर ३१ जुलै रोजी, तर १२वी चे पेपर ९ ऑगस्ट रोजी होतील.
Mumbai Rains Update: तानसा पाठोपाठ वैतरणा धरण भरले, मुंबईसह ठाण्यातील पाणी कपात मागे; अंबरनाथकरांची पाण्याची चिंता मिटली
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक याआधी जाहीर केले होते. या परीक्षा इयत्ता बारावीसाठी १६ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान आणि दहावीसाठी १६ जुलै ते ३० ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत. या परीक्षेत दहावीचा विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा पेपर २६ जुलै रोजी होणार होता. तर बारावीचे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान आणि एमसीव्हीसी या विषयांचे पेपरही २६ जुलै रोजी नियोजित होते.राज्यात पुणे, कोकण, मुंबई भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने गुरुवारी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. शुक्रवारीही पावसाचा अंदाज असल्याने पुण्यातील शाळांना सुटी जाहीर झाली आहे. त्या अनुषंगाने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे शुक्रवारचे पेपर पुढे ढकलले आहेत. आता दहावीचा पेपर ३१ जुलै रोजी सकाळी होईल. तर बारावीचे तीनही विषयांचे पेपर ९ ऑगस्ट रोजी होणार आहेत. या दृष्टीने मंडळाने परीरक्षकांना प्रश्नपत्रिका व्यवस्थित पेट्यांमध्ये सीलबंद अवस्थेत सुखरूप ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा पुन्हा देण्यास संधी देण्यात येईल. त्यांची परिक्षा पुन्हा घेतली जाईल. दरम्यान मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. पुणे आणि कोल्हापुरात धुवांधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.