Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nashik Rain: नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम; भावली धबधबा परिसरात दरड कोसळली, लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मुसळधार पावसामुळे नाशिककरांचे पाणी कपातीचे संकट टळले आहे. नाशिकचे गंगापूर धरण ५० टक्के भरल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तर दारणा धरण जवळपास ८०% भरल्याने ८००० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. चार दिवस झालेल्या संततदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याची दिसून आली आहे. भावली धरण १००%, मुकणे धरण २५% तर वालदेवी धरण देखील ३८% भरलं आहे. तर पुढचे ४८ तास जिल्ह्यात संततधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.नाशिक जिल्ह्यातील धरण परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने दारणा धरण ८० टक्के भरले आहे. या धरणातून धारणा नदीमध्ये ८ हजार क्यूसेस इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळेच दारणा नदीची पाणीपातळी वाढली आहे. इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून चांगला पाऊस सुरू असल्याने दारणा धरणासह अन्य धरणांच्या पाणीपातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दारणा नदीची पाणीपातळी वाढल्याने दारणा नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील धरणातून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात जात असल्याने नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसाचा फायदा मराठवाड्याला देखील मिळणार आहे.
पावसामुळे नाशिकमधील नद्या दुथडी भरून वाहत आहे. पावसाच्या पाण्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे शहरातील अनेक चौकात वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळाले आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने वाहतूक संथ गतीने सुरु आहे.