Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Satara Rain: राज्यात मुसळधार! ‘या’ जिल्ह्यात धबधबे आणि पर्यटनस्थळे २८ जुलैपर्यत बंद, वर्षाविहारासाठी जाणार तर कारवाई होणार
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व पर्यटनाचे पॉईंट्स, धबधब्यांच्या ठिकाणी वर्षाविहारासाठी पर्यटक येत आहेत. या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, जीवित आणि वित्तहानी होऊ नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने धबधबे तसेच पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळा, भिलार आणि सर्व पर्यटनाचे पॉईंट, पाटण तालुक्यातील ओझर्डे (नवजा) तसेच सडावाघापूर धबधबा, सातारा तालुक्यातील ठोसेघर, केळवली, वजराई – भांबवली धबधबे व कास तलाव तसेच जावली तालुक्यातील ऐकीव ही धबधब्याची ठिकाणे व सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी बंद करण्यात येत आहेत.हे धबधबे, पर्यटनस्थळांच्या ठिकाणी मुसळधार पावसाच्या कालावधीत पर्यटकांना दि. २८ जुलैपर्यंत जाण्यास तात्पुरत्या स्वरूपात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस विभागाने धबधबे व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी जाणारे सर्व रस्ते बंद करावेत. पोलीस व संबंधित गावातील वन समितीने धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक जाणार नाहीत. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, याबाबत दक्षता घ्यायची आहे. पर्यटनस्थळी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त नेमून आवश्यक त्या ठिकाणी गस्त घालावी. त्याचप्रमाणे पोलीस बंदोबस्तासाठी होमगार्ड विभागाची मदत घ्यावी आणि नियमांचा भंग करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिल्या आहेत.
संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीमध्ये सततच्या पावसामुळे खालचा टप्प्यावर पाणी आले असून दहा अग्नीकुंड पाण्याखाली गेले आहेत. वरील टप्प्यावर अंत्यसंस्कार सुरू आहेत. मात्र, संततधार पाऊस व कण्हेर धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने संपूर्ण कैलास स्मशानभूमी पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावयाचे असल्यास संपर्क करून माहिती घेऊनच कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कारसाठी मृतदेह आणावेत, असे आवाहन श्री बालाजी ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांनी केले आहे.