Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बदलापुरात उल्हास नदीला पूर, ३१ जणांची एनडीआरएफची टीम बदलापूरकडे रवाना

7

प्रदीप भणगे, बदलापूर : बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हासनदीला पूर आला आहे. त्यामुळे बदलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्याहून एनडीआरएफची ३१ जणांची टीम सुद्धा बदलापूरकडे रवाना झाली आहे.

उल्हास नदीची धोक्याची पातळी १७.५० मीटर इतकी असून सध्याची पातळी मात्र १८.२० मीटरवर गेली आहे. त्यामुळे उल्हास नदीकाठची चौपाटी संपूर्णपणे पाण्याखाली गेली असून नदीकाठचा पेट्रोल पंपही पाण्यात बुडाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बदलापूर शहराकडून बदलापूर गाव आणि ग्रामीण भागाकडे जाणारी संपूर्ण वाहतूक प्रशासनाने बंद केली आहे. तर सखल भागातल्या नागरिकांना सोनिवली इथल्या बीएसयूपी प्रकल्पात तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आलं आहे.
Pune Rain: कंबरभर पाण्यात गाडी घालण्याचा अतिशहाणपणा, पुण्यात कार वाहत निघाली, इतक्यात… थरारक घटनेचा VIDEO
दरम्यान, मोहिली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उल्हास नदीचे पाणी शिरल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र सध्या बंद करण्यात आलं आहे. नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्र चालू करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. यामुळे मांडा, टिटवाळा, उंबरणी, बल्याणी, आटाळी, आंबिवली, मोहने, वडवली आणि कल्याण पश्चिमेकडील काही भागतील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

मुसळधार पावसामुळे उल्हास नदी, वालधूनी नदी आणि काळू नदी दुथडी भरून वाहत आहेत. या नद्यांनी इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीवरून वाहण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने या नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
Kolhapur Rain : कोल्हापूरला महापुराचा विळखा घट्ट, पंचगंगेने धोका पातळी गाठली; राधानगरीचे ५ स्वयंचलित दरवाजे उघडले

अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचा गाभाऱ्यात साचलं पाणी

वालधुनी नदीला पूर आल्यामुळे भगवान महादेवाला जलाभिषेक झाला आहे. अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचलं आहे. मंदिराच्या बाजूने वाहणाऱ्या वालधुनी नदीला पूर आल्यामुळे गाभाऱ्यात गुडघाभर पाणी साचलं असून त्यामुळे भगवान भोलेनाथाला जलाभिषेक झाला आहे.

प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरल्यामुळे भाविकांसाठी गाभारा बंद करण्यात आला असून गाभाऱ्यातील भगवान भोलेनाथाचा मुखवटा गाभाऱ्याच्या बाहेर काढून ठेवण्यात आला आहे. या मुखवट्याचं दर्शन आणि पूजा सध्या भाविक करत आहेत. पाणी ओसरेपर्यंत कुणालाही गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचं पुजाऱ्यांनी सांगितलं आहे. दरवर्षी मोठा पाऊस झाल्यानंतर वालधुनी नदीचा प्रवाह वाढत असल्यामुळे प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात अशाप्रकारे पाणी साचून भगवान भोलेनाथाला जलाभिषेक होत असतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.