भाजपला हादरा, गडकरींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणारा बडा नेता उद्धव ठाकरेंच्या गटात

मुंबई : गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे आज ‘मातोश्री’वर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधणार आहेत. मूळचे शिवसैनिक असलेले रमेश कुथे यांची या निमित्ताने घरवापसी होत आहे. २०१८ मध्ये रमेश कुथे यांनी केंद्रीय मंत्री आणि दिग्गज भाजप नेते नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश करून खळबळ उडवून दिली होती.

पूर्व विदर्भात शिवसेनेचा चेहरा

पूर्व विदर्भात शिवसेनेला पाहिजे तसा चेहरा मिळत नव्हता. मात्र १९९५ मध्ये रमेश कुथे यांनी तत्कालीन आमदार तसेच मातब्बर नेते हरिहर भाई पटेल यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता. तेव्हापासून रमेश कुथे हे प्रसिद्धीच्या झोतात आलेले होते. रमेश कुथे यांनी दोनदा आमदार पदी निवडून येत गोंदिया जिल्ह्यात शिवसेनेला बळकटी आणली होती.
Dilip Mohite Patil : मोहिते पाटलांना शह देण्याचा चंग, ठाकरेंच्या शिलेदाराने कंबर कसली; पुरंदर, खेड, जुन्नरला मोठी ताकद

गोंदिया विधानसभा मतदारसंघातून लढण्याचे संकेत

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला सपाटून पराभव पत्करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर रमेश कुथे मातोश्रीवर शिवबंधन बांधून घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपली उमेदवारी पक्की करतील असं म्हटलं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत गोंदिया विधानसभा मतदारसंघातून रमेश कुथे हे निवडणुकीला सामोरे जातील, असं पण म्हटलं जात आहे.
Babajani Durrani : शब्दात अडकलेल्या अजितदादांनी तिकीट नाकारलं, दुर्रानी नाराज, शरद पवारांकडे घरवापसीचे संकेत

विदर्भात भाजपला दुसरा धक्का

गेल्या काही काळात भाजपला विशेषतः विदर्भात बसलेला हा दुसरा धक्का मानला जात आहे. कारण नुकतंच भाजपमध्ये कार्यरत असलेले माजी खासदार शिशुपाल पटले यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यांनी आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला होता. राज्य सरकार शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचं सांगत आपण अनेकदा या समस्यांबाबत संबंधित मंत्र्यांना भेटूनही कामे होत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.

शिशुपाल पटले यांनी भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यांनी २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचाही पराभव केला होता. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले आणि आता कुथे यांनी दिलेला राजीनामा विदर्भात भाजपसाठी एकामागून एक मोठे धक्के मानले जात आहेत.

Source link

Maharashtra politicsRamesh Kutheshiv senaVidhan Sabha Election 2024उद्धव ठाकरेनितीन गडकरीरमेश कुथे शिवसेना
Comments (0)
Add Comment