बँकेवर सायबर दरोडा
इंडिसइंड बँकेमध्ये ४० कोटींची अपहार झाल्याची घटना झाली होती. याबाबत तक्रार येताच सायबर पोलिसांनी ३२ कोटी रुपये वाचविले आणि हा बँक दरोडा होण्यापासून रोखला. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
पटेल यांची बदनामी करणारा अटकेत
जुहूमधील राहुल नावाच्या इसमाने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांचा नंबर एका पेड अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मिळवला आणि कतारमधील काही नागरिकांशी संपर्क करून पैसे मागितले. पटेल यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तक्रार केली आणि सायबर पोलिसांनी तपास करून राहुल कांत याला अटक केली.
अंजली बिर्ला यांचीही बदनामी
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीच्या नावाने सोशल मीडियावर बदनामीच्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. ध्रुव राठी यांच्या नावाने बनावट अकाऊंट चालवणाऱ्या व्यक्तीने या पोस्ट केल्या होत्या. याबाबत आणखी ७ ते ८ लोकांना समन्स देण्यात आले आहे. आम्ही यासंदर्भात योग्य ती कारवाई करत असल्याची यादव यांनी सांगितले.
ऑपरेशन ब्लॅक फेस
बाल लैंगिक छळाच्या राज्यात आतापर्यंत ६ लाख तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यातील जवळपास ४ लाख तक्रारींच निवारण झाले आहे. राज्यभरात ४१७ गुन्हे दाखल करून १७४ जणांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलांचा छळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी हाती घेतलेले ऑपरेशन ब्लॅक फेस यापुढेही चालू राहणार असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.