मुंबईकरांसाठी सरकारकडून गिफ्ट, महालक्ष्मी रेसकॉर्सवर आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य सेंट्रल पार्क

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : महालक्ष्मी रेसकॉर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य सेंट्रल पार्कची उभारणी केली जाणार आहे. यासाठी लागणारा भूखंडही महापालिकेच्या ताब्यात आला आहे. आता मुंबई महापालिका या पार्कसाठी आराखडा तयार करत असून कोणतेही मोठे बांधकाम न करता आणि रेसकोर्सला धक्का न लागता या पार्कची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका त्याचे नियोजन करत आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सवरील सुमारे १२० एकर क्षेत्र आणि त्यासोबत मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील सुमारे १७५ एकर क्षेत्र असे संपूर्ण मिळून जवळपास ३०० एकर क्षेत्रावर सेंट्रल पार्कची उभारणी केली जाणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्स भूखंडावरील एकूण २११ एकरपैकी सुमारे ९१ एकर भूखंड ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना देण्याच्या करारावरही जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेला १२० एकर जागा प्राप्त झाल्याने न्यूयॉर्क, लंडनच्या धर्तीवर सेंट्रल पार्क उभारण्याच्या कामाला महापालिका गती देणार आहे.
Mumbai News: महामार्गांवर पूर्णपणे होर्डिंग बंदी; मुंबई महापालिकेकडून नवे धोरण लवकरच

रेसकोर्स येथूनच सागरी किनाऱ्याला जोडणारा भुयारी मार्ग

या कामासाठी मुंबई महापालिकेकडून आराखडा केला जाणार असून त्याचे काम सुरू झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. महापालिकेच्या मुंबई सागरी किनारा मार्ग प्रकल्पात तब्बल १७५ एकर मोकळी जागा उपलब्ध होणार असून तेथेही उद्यानासाठी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. रेसकोर्स येथूनच भुयारी मार्ग करून तो सागरी किनारा मार्गालाही थेट जोडण्याचे नियोजन आहे. हे पार्क एक ते दीड वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले असून पार्कच्या कामासाठी लवकरच निविदाही काढली जाणार आहे.
Ghodbunder To Bhayandar Elevated Road : घोडबंदर ते भाईंदरपर्यंतची वाहतूक कोंडी सुटणार; एलिवेटेड रोड सुरू होणार? कसा असेल मार्ग?

पार्काची वैशिष्ट्ये

या पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात उद्याने, विविध प्रकारची झाडे, आसन व्यवस्था, जायंट व्हील यांसह अद्ययावत सुविधा दिल्या जाणार आहेत. रेसकोर्सवर कोणत्याही प्रकारचे मोठे बांधकाम करू नये, अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली होती.

Source link

BMCmahalaxmi race coursemahayuti sarkarmumbai central parkMumbai Coastal Roadआंतरराष्ट्रीय सेंट्रल पार्कमहायुती सरकारकडून गिफ्टमहालक्ष्मी रेस कोर्सवरील प्रकल्पमुंबई महानगरपालिकेचा प्रकल्पमुंबई सेंट्रल पार्क
Comments (0)
Add Comment