राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे छत्रपती संभाजीनगर येथे कारमधून जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर तीन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा बदला म्हणून हा हल्ला झाल्याचे मानले जात आहे. आता या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेने स्वीकारली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत आम्हीच हल्ला केला असल्याचे सांगितले आहे. तसेच जितेंद्र आव्हाडांवरही ताशेरे ओढले आहेत.
संभाजीराजे यांनी विशाळगडावरील अतिक्रमणांविरोधात कठोर भूमिका घेतल्याने त्यांच्या संघटनेने आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाला नंतर हिंसक वळण लागले. परिणामी किल्ल्याच्या आवारातील निवासी आणि इतर मालमत्तेचे नुकसान झाले होते. या हिंसाचारानंतर आव्हाड यांनी संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती. यामुळे संभाजीराजे समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना आव्हाड ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीवर तीन जणांनी हल्ला केला. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना एका सदस्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. व्हिडिओमध्ये स्वराज्य सरचिटणीस धनंजय जाधव म्हणाले की, “जितेंद्र आव्हाड, तुम्हाला युवराज छत्रपतींच्या रक्ताची चाचणी करून ते छत्रपती घराण्यातील आहे की नाही हे पाहावे लागेल. जर तुम्ही खरा माणूस असता तर तुम्ही धावले नसते. तुमचा पलायन संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी स्वराज्य संघटना स्वीकारते, असं त्यांनी व्हिडिओमधून सांगितले आहे.

स्वराज्य सरचिटणीस धनंजय जाधव पुढे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड तुम्ही घाबरून का पळालात? एवढीच हिंमत आहे तर यायचे ना समोर. कॅमेरासमोर कोणीही छाती बडवतो, हिंमत असेल तर सामोरे या, असं म्हणत आव्हाडांना थेट आव्हान दिले आहे. जितेंद्र आव्हाड टिव्हीवर प्रतिक्रिया देत आहेत, ती चुकीची आणि खोटी माहिती पसरवत आहे. स्वराज्य पक्षाच्या वतीने प्रतिनिधी बोलवावेत. छत्रपती संभाजीराजे यांच्यावर केलेली टीका स्वराज्यचा मावळा सहन करणार नाही. स्वराज्य पक्ष पूर्ण ताकदीने हल्ला करणाऱ्या आमच्या बांधवांच्या पाठिशी उभी आहे, असं धनंजय जाधव यांनी ठणकावून सांगितलं.