मुलीने मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा संशय, आईची पोलीस स्टेशनमध्ये धाव

ठाणे : उल्हासनगर शहरात केरला फाईल या हिंदी चित्रपटात घडलेल्या कथाप्रमाणे काहीसा प्रकार समोर आला आहे. एका कुटुंबाने त्यांच्या मुलीने मुस्लीम धर्म स्वीकारल्याने आणि तिचा गैरवापर होत असल्याच्या संशयावरून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गंभीर तक्रार दाखल केली आहे. फिर्यादींच्या मते, त्यांची मुलीने मुस्लीम धर्म स्वीकारल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिच्या परत येण्याची आशा धरली होती. परंतु, ती आणि तिचे साथीदार फिर्यादींना तिच्या सध्याच्या वास्तव्याबाबत काहीच माहिती देत नव्हते. अखेर मुलीच्या पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दोघांना अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील ८ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या उल्हासनगर कॅम्प ४ मधील समता नगर मधील गणेशनगर चाळ येथे कुटुंबासह राहतात. त्यांची मुलगी विज्ञान शाखेत बारावी झाली आहे. ती शेजारी राहणाऱ्या अफिदा शेख हिच्या मुलांची ट्युशन घ्यायची. त्यामुळे शेख परिवाराचे फिर्यादी यांच्या घरी येणे जाणे होत होते. एप्रिल २०२२ मध्ये फिर्यादी महिलेने मुलीला नवरात्रीचा उपवास सोडण्यास बोलावले. तेव्हा तिने प्रसाद खाण्यास नकार देत, मी रोजे धरले असल्याचे सांगितले. त्यावेळी दोघांमध्ये भांडण झाले असता आफिदा शेख हिने मध्यस्थी करून रोजे धरले आहेत, तिच्यावर दबाव आणू नका असे सांगितले.
Sanjay Raut : देशमुखांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपने तुरुंगातून प्रवक्ता आणला, राऊतांची शेलकी टीका

दरम्यान ती मुलगी युट्युबवरील जाकीर नाईक यांचे व्हिडीओ पाहायची. मुलगी आणि शबाना शेख ह्या यांच्या घरी अभ्यास करायला जायची. रात्री उशीरापर्यंत अभ्यास करून कधी कधी त्यांच्याच घरी झोपायची. त्यावेळी शबाना शेख ही इस्लामचे शिक्षण देत होती, असे फिर्यादीमध्ये नमूद केलं आहे. तसेच फिर्यादीच्या मुलीने बुरखा घातलेला फोटो इंस्टाग्रामवर शेजारच्या एका बाईने दाखवला होता. त्यावर मुलीला बुरखा घातलेल्या फोटोबाबत विचारणा केली, त्यावर तिने सहजच तो फोटो काढलेला आहे, असं सांगत मुलीने विषय उडवून लावला होता.

२६ जून २०२२ रोजी डॉ. सपना भिसे यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी त्यांच्यासोबत फिर्यादी ह्या लंडनला गेल्या होत्या. त्या १८ नोव्हेंबर २०२२ रोजी लंडन येथून भारतात परतल्या. तेव्हा मुलीने धर्मांतरण करून मुस्लिम धर्म स्वीकारल्या बाबतचे शाहदत पत्र दाखवत घर सोडून निघून गेली. त्यावर उल्हासनगर आणि अंबरनाथ मस्जीद ट्रस्ट, मुस्लीम जमात असा शिक्का होता. मुलगी ही परत घरी आली नाही म्हणून २९ नोव्हेंबर २०२२ रोजी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे जाऊन दृष्टी हरवली असल्याची तक्रार दाखल केली. तेव्हा मुलीला पोलिसांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे बोलावून घेतले. तिने तिथे मी मुस्लिम धर्म स्वीकारला असल्याचे सांगत घरी आली. त्यावेळी अनिना खान ही फिर्यादी यांच्याजवळ आली. इस्लाम धर्म हा चांगला असल्याचे समजावू लागली. त्यावेळी माझ्या मुलीने जर इस्लाम धर्म स्वीकारला असेल तर तिला रॉकेल टाकून जाळून टाकेन असे अमिना खानला म्हणाल्या. तेव्हा मुलीच्या केसालाही तुम्ही हात लावू शकत नाही, अन्यथा मस्जिदवाले येऊन तुमच्या नाका तोंडातून रक्त काढतील, अशी धमकी अमीना खान हिने दिली.

मुलीने अनेक वेळा फोनवरून संपर्क करून पैशांची मागणी केली. तसेच वडिलांच्या खात्यातून अनेक वेळा रक्कम काढून घेतली. फिर्यादी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलची बुध्दी भ्रष्ट करून तिला कट्टर मुस्लीम बनवले जात आहे. तसेच तिला गैरकृत्यासाठी वापरले जात असल्याचा त्यांना संशय वाटत होता. तसेच दृष्टीकडून ‘काफिर’, ‘जिहाद’ असे शब्द ऐकू येत असल्याने आणि तिच्या हातून समाज विघातक, राष्ट्र विघातक गुन्हे घडू नये म्हणून आणि कुटुंबियांच्या जिवाला धोका होऊ नये म्हणून विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठत गुरुवारी रात्री ,सलीम चौधरी, शबाना शेख, शबाना शेख हिची मुलगी महेक शेख, शबाना शेखची बहिण अमिना, अफिदा खातुन, अफिदा खातुनचा पती वसिम शेख, बाबु दास, काझी इलियाज निजामी, ॲड. कमरूदिदन अन्सारी आणि त्या मुलीवर असे मिळून १० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Source link

complaint of girl converting to islamcrime newsThane crime newsthane policeक्राइम बातम्याठाणे क्राइम बातम्याठाणे पोलीसमुलीने मुस्लीम धर्म स्वीकारल्याची तक्रार
Comments (0)
Add Comment