चिल्लर लोकांच्या नको, राज्यातील ४ प्रमुख नेत्यांच्या गाड्या फोडा! आंबेडकरांनी नावं सांगितली

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शरद पवार गटाचे आमदार आणि माजी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार फोडल्याच्या घटना ताज्या आहेत. त्यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. मिटकरी आणि आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या कार कशाला फोडताय? फोडायच्याच असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा, असं चिथावणीखोर विधान आंबेडकरांनी केलं आहे. ते नांदेडमध्ये सभेला संबोधित करत होते.

चिल्लर लोकांच्या गाड्या कशाला फोडता? त्या गाड्या फोडणाऱ्यांना माझं आवाहन आहे. तुम्हाला मी चार माणसांची नावं देतो, त्यांच्या गाड्या फोडा, असं वादग्रस्त विधान आंबेडकरांनी केलं. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या गाड्या फोडा, असं आंबेडकर पुढे म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
MVA Dispute : नागपुरातील सहापैकी एकही मतदारसंघ मित्रपक्षांना सोडू नका, काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेने खळबळ
ओबीसी आरक्षण धोक्यात आलं आहे, मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे गावागावात दोन तट निर्माण झाले आहेत. त्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी काही जण दंगली घडवून आणतील, भडकाभडकी होईल, अशी भीती अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. अनेक जण दंगल करायला येतील किंवा दंगल करायला सांगतील. येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भडकभडकी होईल. ती होऊ नये यासाठी दक्षता घ्यायची आहे असं आवाहन आंबेडकरांनी ओबीसी बांधवाना केलं.

मराठा ओबीसीतील वादाचा फायदा सर्वच राजकीय पक्ष घेत आहेत. शरद पवार यांचं वक्तव्य आलं की महाराष्ट्राचा मणिपूर करू नका. हे वक्तव्य आग लावणारं आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका की तुम्ही नरेंद्र मोदीकडे जा, जागा वाढवून घ्या आणि मग आपण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ. ही भूमिका चिथावणीखोर असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज्यातील जनतेचं कौतुक करतो की ते राजकीय मतभेद सामजिक करु इच्छित नाहीत असं अॅड प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Source link

Maharashtra politicsPrakash AmbedkarSharad PawarUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसप्रकाश आंबेडकरशरद पवार
Comments (0)
Add Comment