Pune News: कऱ्हा-नीरा नद्या जोडणार; बारामतीचा दुष्काळ संपवण्यासाठी अजित पवारांची घोषणा

म. टा. प्रतिनिधी, बारामती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बारामती शहराच्या विकासासोबत ग्रामीण भागातील दुष्काळ कायमचा हद्दपार करण्याचे वचन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या जनतेला दिले आहे. ‘माझ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कायमचे दुष्काळ मुक्त करण्यासाठी कऱ्हा-नीरा नदी जोडप्रकल्प राबविणार आहे,’ असे सांगून त्यांनी जणू विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘एक कुटुंब एक झाड’ या उपक्रमाचा प्रारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला. त्या वेळी त्यांनी या प्रकल्पाची घोषणा केली.

शेतकऱ्यांसाठी योजना ठरणार वरदान …

अजित पवार पुढे म्हणाले, ‘नीरा-भीमा खोऱ्यात दर वर्षी अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस पडतो . पावसाळ्यात नीरा नदीमध्ये पाणी येथे हे पाणी वाहून जाते . ते पाणी कऱ्हा नदीला आणून मिळविण्यासह मधल्या पट्ट्यातील तलाव भरून घेण्याची ही योजना आहे . बारामतीच्या दुष्काळी पट्ट्यातील माझ्या शेतकऱ्यांना ही योजना वरदान ठरेल. लवकरच या योजनेसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ’

विरोधकांबाबत काय म्हणाले अजित पवार?


‘महायुतीच्या योजनांवर विरोधक ‘चुनावी जुमला’ म्हणून टीका करत आहेत. अनेक विरोधक खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत . आम्ही मात्र सुसंस्कृतपणे विकासाच्या मुद्द्यावर भूमिका मांडणार आहोत. कोणीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार नाही . आमच्याकडे विकासाच्या सांगण्यासारख्या योजना असल्याने त्यावरच बोलू,’ असे अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar: चुxx शब्द बोलता बोलता अजित पवार थांबले, शब्द फिरवला अन् म्हणाले…
‘योजना कायमस्वरूपी’

‘मी गेले दहा वर्षे अर्थमंत्री म्हणून कार्यरत आहे. अडीच कोटी महिला डोळ्यांसमोर ठेवूनच लाडकी बहीण योजना कार्यान्वित केली आहे. यासाठी ४६ हजार कोटींची गरज लागणार आहे. अर्थात सरकारने याची तयारी केलेली आहे . ही योजना पुढे कायमस्वरूपी चालू ठेवायची असेल, तर महायुतीच्या उमेदवारासमोरील बटण दाबावे लागेल,’ असे अजित पवार म्हणाले . ‘अर्थात लोकशाही आहे, तुम्हाला योग्य वाटेल त्या उमेदवाराला तुम्ही मत देऊ शकता,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Source link

ajit pawarbaramati drought affected areamahayutincp ajit pawar groupकऱ्हा नदी बारामतीनीरा देवघर धरणनीरा-भीमा खोरेपुणे बातम्यापुणे महापालिका
Comments (0)
Add Comment