दादरला सूटकेसमध्ये बॉडी, मूकबधीर अ‍ॅनिमेटरकडून ‘त्या’ घटनेचं शूटिंग, मित्रांना व्हिडिओ कॉलही

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मित्राची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन मूकबधिर आरोपींनी हत्या करतानाच्या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्याचे समोर आले आहे. हत्या करताना त्यांनी काहींना व्हिडीओ कॉल केल्याचेही समजते. प्रेम किंवा पैसे हा अर्शद शेख याच्या हत्येमागील उद्देश असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून आरोपी जय चावडा आणि शिवजीत सिंग दोघेही मूकबधिर असल्याने चौकशीत अडचणी येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

नेमकं काय घडलं?

दादर स्थानकातून कोकणात जाणारी तुतारी एक्सप्रेस पकडण्याचा एक तरुण करीत होता. त्याच्याकडे असलेली मोठी ट्रॉली बॅग जड असल्याने त्याला पेलवत नव्हती. या बॅगेखाली पडलेले रक्ताचे थेंब ड्युटीवरील आरपीएफ जवानाच्या निदर्शनास आले. त्याने बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला. दादर रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाणाऱ्या जय चावडा याला दादर स्थानकातूनच ताब्यात घेतले. तर त्याने दिलेल्या माहितीनुसार पायधुनी पोलिसांनी उल्हासनगर येथून शिवजीत सिंग याला अटक केली. पायधुनी पोलिस या दोघांची कसून चौकशी करीत असून ते देत असलेली माहिती समजावी यासाठी एका शिक्षकाची मदत घेतली जात आहे.
Goregaon Couple Death : बायकोचा खून करुन आत्महत्या, मुलाचा गोंधळ उडू नये म्हणून पेडणेकरांनी केलेली सोय, ‘तो’ मेसेज देणार कलाटणी

मोबाइल फोनमध्ये चित्रित

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जय चावडा याने सांगितलेली माहिती धक्कादायक आहे. जय हा एका खासगी कंपनीत अॅनिमेशनचे काम करतो. रविवारी जय याच्या पायधुनीतील घरामध्ये तो, शिवजीत आणि अर्शद दारू पिण्यासाठी बसले होते. जय हा दारू घेऊन आला त्यावेळी शिवजीत आणि अर्शद यांच्यात जोरदार भांडण सुरू होते. रागाच्या भारत घरातील हातोडा शिवजीतने अर्शदच्या डोक्यात घातला. तो इतक्यावरच थांबला नाही तर घरातील काच फोडून त्याने त्याच्या शरीरावर वार केले. ही सर्व घटना जयने मोबाइल फोनमध्ये चित्रित केली. हे चित्रीकरण करण्यामागील नेमके कारण कोणते, याचा तपास पोलिस करीत आहेत. त्यानंतर शिवजीतने धमकावून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितल्याचे जयने म्हटले आहे. मृतदेह बॅगेत भरून मी पायधुनी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गेलो. तेथून खोपोली लोकल पकडून दादर येथे उतरलो आणि तेथून मेल पकडण्यासाठी ११ क्रमांकाच्या फलाटावर गेल्याचे जय सांगत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

पोलिसाच्या मुलाने केली मदत

रविवारी रात्री मृतदेहासह जय याला ताब्यात घेतल्यानंतर नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. मात्र मूकबधिर असल्याने तो नेमके काय सांगतो आहे हे कळत नव्हते. यावेळी या ठिकाणी गस्त घालणाऱ्या एका कॉन्स्टेबलने हा प्रकार पाहिला. त्याने माझा मुलगाही मूकबधिर आहे असे सांगून त्याला घेऊन आला. कॉन्स्टेबलच्या मुलाच्या माध्यमातून पोलिसांनी जय चावडा याच्याकडून जुजबी माहिती मिळवली आणि त्यावरून घटनाक्रम समजला.

Source link

Dadar Station NewsDead Body in Suitcasemumbai crimemumbai newsTutari Express Dead Bodyतुतारी एक्स्प्रेस मूकबधीर मृतदेहदादर स्टेशन सुटकेस मृ्तदेहदादर स्थानक तुतारी एक्स्प्रेस डेड बॉडीमुंबई मूकबधीर तरुण हत्यामूकबधीर मित्र तरुण खून
Comments (0)
Add Comment