रायगड जिल्ह्यात नागोठणे कोलाड खांब अगदी माणगाव पर्यंत भले मोठे खड्डे पडले आहेत, यामुळे अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. याच महामार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. आपण आपल्या गाडीसाठी नवीन टायर घातला होता तर टायर अवघ्या चार दिवसात फाटले जात आहेत, चालक विचारतात याचा जाब कोणाला विचारायचा, अशी अत्यंत दयनीय अशी महामार्गाची दुरावस्था आहे. इतकंच नाही तर अलीकडेच गेल्या आठवड्यात नागोठाणे जवळ पडलेल्या मोठ्या खड्ड्यात एक कार अडकली होती ती कार अक्षरशः धक्का देऊन मदतीने बाहेर काढावी लागली. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची हीच अवस्था राहणार का अशी उद्विग्न प्रतिक्रिया याच महामार्गावरून प्रवास करणारे चालक अनिकेत कांबळे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ जवळ बोलताना दिली आहे.
महामार्गावर याच पावसाळ्यात भरणे नाक्यावरील नवीन पुलाला पडल्याने एक लेन बंद ठेवावी लागली आहे परशुराम पाटील संरक्षण कठडा काही भाग याच पावसाळ्यात कोसळला आहे. चिपळूण बहादूरशेख नाका गेल्यावर्षी पडला होता, अनेक ठिकाणी महामार्गाला खड्डे पडले आहेत. मात्र याच सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे बुजून महामार्ग सुस्थितीत केला जाईल असे आश्वासन दिले आहे.