पुढे संजय शिरसाट म्हणाले राऊतांना,तुम्ही काय चित्रपट काढता? दलाल नं 1 हा चित्रपट तुमच्यासाठी मी काढणार आहे. लाडकी बहिणीच्या तोंडात घास जावू नये यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. टीका करण बंद करा, रोज जे चालले आहे ते फार किळसवाणे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एवढं कधीही झाले नाही
येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीत जनता तुम्हाला जागा दाखवणार आहे अशी प्रतिक्रिया शिरसाटांनी दिली.
उद्धव ठाकरे तुम्ही शिवाजी महाराज आहात का?
संजय शिरसाट यांनी संजय राऊतांसोबत उध्दव ठाकरेंवर सुद्धा निशाणा साधला. उद्धव ठाकरे तुम्ही शिवाजी महाराज आहात काय? असा सवाल शिरसाटांनी केला. तुम्ही ऐतिहासिक बोलू नका, खोटं बोलण्याची हद्द असते अशी टीकाच त्यांनी ठाकरेंच्या अमित शाहांवरील टीकेवर केली. दिल्लीवारी करून आल्यावर त्यांना काहीही सुचत आहे, दिल्लीत शेपूट खाली घालून आलेत अशा शब्दात शिरसाट म्हणाले. संजय राऊत यांनी दोन महिने थांबा म्हणतात तर त्या पुढे त्यांनी 0 लावावा, म्हणजे २० वर्ष होईल, कार्यकर्ते दूर जाऊ नये म्हणून राऊत आणि ठाकरेंचे भाष्य आहे अशी प्रतिक्रिया दिली.