मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृतज्ञता सोहळ्यातील भाषण अटकून मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना मैदान असलेल्या तृतीयपंथीयांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. मुख्यमंत्री आमच्या मागण्याकडे लक्ष देईल का अशी विनंती यावेळी तृतीयपंथयांकडून करण्यात आली. यावेळी तृतीयपंथी म्हणाली की,आम्हाला सिग्नलवर पैसे मागू दिले जात नाही. आमच्यावर कारवाई होत आहे. मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण काढली,लाडका भाऊ काढला. मात्र लाडका किन्नर कोणी काढला का?या तृतीयपंथांचा कोणी आशीर्वाद घेतलाय का? आम्हाला सगळ्यांनी नाकारलं, आम्हाला जगणं मुश्किल झाले असल्याचं यावेळी तृतीय पंथी म्हणाले.
आज छत्रपती संभाजीनगरात सीएम शिंदे यांच्यासाठी कृतज्ञता सोहळा ठेवण्यात आला होता. या सोहळ्यात बोलताना सीएम शिंदे म्हणाले, आंबेडकरी जनतेच्या वतीने सोहळा होत आहे, मी आभार मानतो, प्रेम व्यक्त करायच्या कृतज्ञता सोहळ्याकार्यक्रम याबाबत मी आभार मानतो. कृतज्ञता आपण सोहळा आयोजित करण्यासारखं काम केलं नाही जे केलं ती माझी जबाबदारी आहे जे काम झालं हा तुमचं अधिकार आहे. बाबासाहेबांना या शहराबद्दल प्रेम होतं, मुंबई नंतर हे शहर प्रिय होत, म्हणून अजिंठा लेणी पायथ्याशी विपश्यना केंद्र तयार करत आहोत. आंबेडकर पुतळा, झोपडपट्टीत लायब्ररी, उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहे.