लग्नात मानपान केला नाही, तुला चांगला स्वयंपाक येत नाही… टोमण्यांना कंटाळली अन् नको तेच केलं

टिटवाळा: हुंड्यासाठी सूनेचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली टिटवाळ्यातील तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदवून सासू, सासरे, दीर, भावजय आणि पतीला अटक केली आहे. लग्नात मानपान केला नसल्याचं म्हणत माहेरहून २० लाख रूपये आणण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे तगादा लावला होता. सातत्याने होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहिनेने शेवटचे टोक गाठून स्वतःचे जीवन संपवले आहे.

आरती केतन भांगरे (२५) असे या विवाहितेचे नाव असून ती टिटवाळ्यातील हरी ओम व्हॅली फेज दोन इमारतीत सासरच्या मंडळींसोबत राहत होती. याप्रकरणी पोलिसांनी सासरा दिनकर काशिनाथ भांगरे, सासू लतिका, नवरा केतन, दीर गुंजन, जाऊबाई मनीषा गुंजन भांगरे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व आरोपी अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील एकदरा गावचे मूळ रहिवासी आहेत. या संदर्भात आरतीचा इगतपुरी जवळील काळुस्ते गावचा रहिवासी असलेला भाऊ जनार्दन घारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Kolkata: रात्री आईला म्हणाली, मी जेवले, तू पण जेवून घे; सकाळी वडिलांना रुग्णालयातून फोन अन्… क्षणात सारं उद्ध्वस्त

टोमण्या-ठोसक्यांना वैतागून गाठले शेवटचे टोक

या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी आरतीचा केतनशी विवाह झाला होता. आरती ही मूळची नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी जवळील काळुस्ते गावची रहिवासी आहे. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी आरतीला टोमणे मारण्यास सुरूवात केली. लग्नाच्या वेळी आमचा मानपान केला नाही. नवीन घरासाठी माहेरहून २० लाख रूपये आण. तुला चांगला स्वयंपाक करता येत नाही, अशाप्रकारे आरतीला दररोज त्रास दिला जात असे.

आरोपींना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी…

सातत्याने होणाऱ्या जाचाला आरती कंटाळली होती. हा सारा प्रकार तिने माहेरच्यांना सांगितला होता. दिवसेंदिवस त्रास वाढू लागल्याने आरतीने शनिवारी रात्री टिटवाळ्यातील सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरतीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवला. आरतीचा भाऊ जनार्दन घारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. कल्याण जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सर्वांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Source link

Crime news in Marathihusband-wifemarried woman commit suicideThane Crimetorture for dowryटिटवाळा महिलेची आत्महत्याटिटवाळ्यात विवाहितेची आत्महत्याठाणे क्राइमसासरच्यांचा जाचहुंडा
Comments (0)
Add Comment