प्रफुल्ल पटेलांना पराभवाची धूळ चारली, माजी खासदाराचा भाजपला रामराम, काँग्रेसचा ‘हात’ हाती

म. टा. वृत्तसेवा, भंडारा : महिनाभरापूर्वी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी खासदार शिशुपाल पटले हे मुंबईमध्ये १५ किंवा १६ ऑगस्टला काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. तुमसर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, बेरोजगार, बावनथडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या १२ गावांना सिंचन व्यवस्था आदी प्रश्नांकडे राज्य व केंद्र सरकार लक्ष देत नसल्याच्या कारणावरून पटले यांनी २५ जुलै रोजी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वचा राजीनामा दिला होता.

राज्यातील पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने त्यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली नाही. त्यामुळे पटले यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले यांचा हा निर्णय भाजपसाठी फार मोठा झटका मानला जात आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पोवार समाज मोठ्या प्रमाणात आहे.
Pathri Vidhan Sabha : तिकीटाच्या आशेने दादांना सोडून शरद पवार गटात, पण नानांनी गेम केला, पाथरीतून उमेदवार जाहीर
गेल्या महिन्यात पटलेंनी आपला राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला होता. राज्य सरकार शेतकरी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. आपण अनेकदा या समस्यांबाबत संबंधित मंत्र्यांना भेटूनही कामं होत नाहीत, त्यामुळे भाजपचा राजीनामा देणार असल्याचा इशारा त्यांनी आधीच दिला होता.

कोण आहेत शिशुपाल पटले?

शिशुपाल पटले यांनी भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवले होते. २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पटलेंनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटलेंनी दिलेला राजीनामा हा भंडारा जिल्ह्यातील भाजपसाठी मोठा धक्का मानला जातो आहे.
Ajit Pawar Confession : सुप्रियांविरुद्ध सुनेत्रांना उभं करायला नको होतं, अजित दादांची खंत, माझं मन मला सांगतंय…
शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारकडे आपण पाठपुरावा करत होतो, मात्र राज्य सरकार आणि सत्तेत सहभागी असलेल्या पक्ष नेतृत्वाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळेच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी स्पष्ट केले होते. जनसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचे तोंड पहावे लागले. ही बाब पक्ष नेत्यांच्या ध्यानात आणून दिली होती. मात्र पक्षामध्ये जुन्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे. भाजपमध्ये लोकशाहीचा अस्त झाला. ज्यांनी भाजपची स्थापना केली त्यांच्या विचारांनाच आताच्या नेत्यांनी तिलांजली दिली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील भाजपा आता राहिली नाही. खऱ्या कार्यकर्त्यांचा भाजपला विसर पडू लागला आहे. कर्मठ सामान्य कार्यकर्त्याची किंमत पक्षाला नाही. सामान्य कार्यकर्त्यांना पक्षात राहून न्याय देता येत नसेल, तर काय उपयोग? अशी खंत शिशुपाल पटले यांनी भाजप सोडताना व्यक्त केली होती.

Source link

bhandara newsmaharashtra assembly election 2024Maharashtra politicsShishupal Natthu Patle in CongressVidhan Sabha Nivadnukचंद्रशेखर बावनकुळेदेवेंद्र फडणवीसनाना पटोलेप्रफुल्ल पटेलभाजप नेता काँग्रेसमध्येशिशुपाल पटले काँग्रेस
Comments (0)
Add Comment