रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये अजित पवार विरुद्ध रोहित पवार यांच्या लढतीची चर्चा असतानाच बारामती विधानसभेत तरुण चेहरा किंवा युवा उमेदवार म्हणून जय पवार यांना संधी दिली जाईल का? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला असता, अजित पवार म्हणाले ठीक आहे देऊया, शेवटी लोकशाही आहे. मला तर बारामतीत काही इंट्रेस्ट नाही, मी सात आठ वेळा निवडणुका लढलो आहे. जनता आणि कार्यकर्त्यांचा जयला तिकीट द्यावे असे म्हणणे असेल तर पार्लमेंटरी बोर्डात त्याचा विचार केला जाईल. पार्लमेंटरी बोर्ड आणि बारामतीमधील कार्यकर्ते जी काही मागणी करतील, ते करायला आम्ही तयार आहोत, असे म्हणत बारामतीतून जय पवार लढण्याचे सूतोवाच अजित पवार यांनी केले.
बारामती मतदारसंघात युगेंद्र पवार हे विधानसभेची तयारी करत आहेत. तर रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेला अजित पवार नेमके कोणत्या पुतण्याविरुद्ध निवडणूक लढवणार हे मात्र गुपित ठेवले आहे. राष्ट्रवादी फुटीनंतर अजित दादा यांचे दोन्ही पुतणे शरद पवार यांच्यासोबत आहेत.