छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरमध्येही आंदोलन
नाशिकआधी छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरमध्येही जमावाकडून मोठं आदोलन करण्यात आलं. रामगिरी महाराजांनी नाशिकच्या सिन्नरमधील पंचाळे गावात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. सिन्नर तालुक्यात सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थानचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. याच सप्ताहात रामगिरी महाराज यांनी प्रेषित महमंद पैगंबर यांच्याविरोधात टीपणी केली. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावल्या दुखावल्या गेल्या आणि नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये जमावाने रस्त्यावर उतकत याविरोधात आंदोलन सुरू केलं.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जमाव रस्त्यावर उतरुन आंदोलन
रामगिरी महाराजांविरुद्ध छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा जमाव सिटी चौक भागामध्ये जमला आहे. रामगिरी महाराजांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या जमावाच्या वतीने करण्यात येत आहे. तसंच जमावाने टायरही जाळले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. दंगा काबू पथक देखील तैनात करण्यात आला आहे. याआधी १६ ऑगस्टच्या रात्रीही आंबेडकर चौकात मोठा जमाव जमला होता. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये १६ ऑगस्ट ते १९ ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद छत्रपती संभाजीनगर नंतर अहमदनगरमध्येही दिसून आले. रामिगिरी महाराज यांनी प्रेषित महमंद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर या विधानावरुन मुस्लीम समाजात मोठा संपात व्यक्त होत आहे. रामगिरी महाराज यांच्या विधानाविरोधात अहमदनगरातही आंदोलन करण्यात आलं. रामगिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात नाशिक, येवला आणि वैजापूर इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.