सोन्याचं अंडं देणारी कोंबडी कापणार असाल, तर लक्षात ठेवा; मुंबईवरुन ठाकरेंचा मोदी-शाहांना इशारा

मुंबई: मुंबईत सध्या जागोजागी मेट्रोच्या नावाखाली जागोजागी खोदकाम सुरु आहे, मुंबईत नाल्याचं पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळतंय त्यामुळे मुंबईकरांची प्रकृती खराब होत आहे. यावरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना सुनावलं आहे.

आज महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ मुंबईतील षणमुखानंद सभागृहात वाढवण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी पहिलं भाषण करत महायुती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप आणि मोदी-शाहांना खडसावलं. मुंबईला संपवायला निघाल तर मुंबई तुमचं काय करेल ते निवडणुकीत कळेलच असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सोन्याचं अंडं देणाऱ्या मुंबईला कापणार असाल तर…. – उद्धव ठाकरे

मुंबईची अवस्था काय करुन ठेवली आहे ते बघा, मुंबईत बेसुमार जे काही खोदकाम चाललं आहे मेट्रोचं. दुसरं इमारती. मग बातम्या येतात की धरणं भरली तरी मुंबईकरांची तहाण का भागत नाही, कारण तुम्ही सगळं खोदून ठेवलं आहे. काही ठिकाणी गटाराचं पाणी पिण्याच्या पाण्यात मिक्स होत आहे, अनेक मुंबईकरांना पोटाचे विकार होत आहेत, जबाबदार कोण याला, असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

मुंबईला यांनी कधी शहर म्हणून पाहिलं नाही. मुंबईकरांना कधी आपलं मानलंच नाही. सोन्याचं अंडं देणारी ही कोंबडी म्हणून जर का नरेंद्र मोदी आणि अमित शहा पाहत असतील, तर स्वत: शाकाहारी असले तरी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी जर तुम्ही कापणार असाल, तर मुंबईकर तुमची काय हालत करेल हे पुढच्या निवडणुकीत कळेलच. येत्या निवडणुकीत मुंबईकर काय करतात दिसेलच, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

तसेच, यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबतही विधान केलं. ‘युतीत बसून काड्या करणारे खूप आहेत. सारखे विचारत असतात,
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का? माझं पृथ्वीराज बाबा किंवा शरद पवार यांना सांगणं आहे, की मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा असेल. आताच्या आता जाहीर करा, पाठिंबा देतो की नाही ते पहा’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना उत्तर दिलं.

Source link

amit shahMaha Vikas Aghadi Mumbai Rallymaharashtra assembly election 2024Vidhan Sabha Nivadnukउद्धव ठाकरे भाषण लाइव्हउद्धव ठाकरे मविआ मेळावा भाषणउद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना टोलामहाविकास आघाडी मुख्यमंत्री उमेदवारमहाविकास आघाडी मेळावा
Comments (0)
Add Comment