निलेश पाटील, जळगाव : नातेवाइकांची अंत्ययात्रा आटपून परत येत असलेल्या पती-पत्नीला ट्रकच्या धडकेत जबर मार लागल्याने दोघं पती-पत्नींचा अपघातात मृत्यू झाला. नातेवाईकांच्या अंत्ययात्रेला हजेरी लावून दुचाकीने चाळीसगावकडे परतताना पती-पत्नी ट्रकच्या धडकेत ठार झाले. ही भीषण घटना एरंडोलपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर न्यू इंग्लिश मीडियम स्कूलनजीक शुक्रवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घडली. अविनाश विजयसिंह पाटील (वय ५८) आणि मीनाबाई अविनाश पाटील (वय ५२) रा. चाळीसगाव असं ठार झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे.अविनाश पाटील हे चाळीसगाव येथील यशवंत विद्यालयात शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ते दुचाकीने पत्नी मिनाबाई पाटील यांच्यासह पिंपळकोठा ता. एरंडोल येथे नातेवाईकांचे निधन झाल्याने अंत्ययात्रेला आले होते. अंत्ययात्रा आटोपल्यानंतर हे दाम्पत्य घराकडे परत जात असताना न्यू इंग्लिश स्कूलपासून थोड्या अंतरावर राष्ट्रीय महामार्गवर ट्रक क्रमांक एमएच १८ बिजी १०६६ने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात मिनाबाई यांच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. तर अविनाश पाटील हे देखील जागीच ठार झाले.
अपघात घडल्याचे पाहून शेतकरी आणि मजुरांनी घटनास्थळी धाव घेतली आणि एरंडोल पोलीस स्टेशनला त्याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शरद बागल हे.कॉ. राजेश पाटील, संदीप पाटील, शिवाजी पाटील हे लागलीच अपघातस्थळी दाखल झाले. अविनाश पाटील यांचा मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, ट्रक चालकाला एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.चौपदरीकरण झाले मात्र पावसामुळे खड्डे झाले
अपघात घडल्याचे पाहून शेतकरी आणि मजुरांनी घटनास्थळी धाव घेतली आणि एरंडोल पोलीस स्टेशनला त्याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शरद बागल हे.कॉ. राजेश पाटील, संदीप पाटील, शिवाजी पाटील हे लागलीच अपघातस्थळी दाखल झाले. अविनाश पाटील यांचा मृतदेह एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, ट्रक चालकाला एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
चौपदरीकरण झाले मात्र पावसामुळे खड्डे झाले
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदरीकरण झाल्यामुळे वाहने सुसाट वेगाने धावतात. सततच्या पावसामुळे महामार्गावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवताना वाहनांची दिशा बदलते त्यामुळे अपघात होण्याचा संभव असतो. महामार्गावरील दुभाजकांमुळे काही वाहने हे विरुद्ध बाजूने ये-जा करतात त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात अपघाताला आमंत्रण दिले जाते.
एकंदरीत महामार्गावरील वाहनांना वेग आला असून कमी वेळेत नागरिक ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात. मात्र, वाहनांमधील प्रवासी आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. महामार्गामुळे एका बाजूला कनेक्टिव्हिटी वाढलेली असली तरी दुसऱ्या बाजूला अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांचा अपघात जर झाला तर तो सुद्धा जीवघेणा ठरत आहे.