बोरिवलीच नव्हे तर गोरेगाव अगदी वसईमधून जाणाऱ्यांना ही नवीन गाडी उपयुक्त ठरणार आहे. या गाडीमुळे मुंबईतील उपनगरांमध्ये राहणाऱ्या कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. निवडणुकीच्या आधी दिलेले आश्वासन कोकणवासीयांच्या वतीने दोन महिने आणि १३ दिवसांमध्ये त्यांनी ही गोष्ट जवळजवळ पूर्णत्वाला आणली त्याबद्दल विशेष करून केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे मनःपूर्वक अभिनंदन आमदार सुनील राणे यांनी केलं आहे. आपल्या गावाकडे कोकणाकडे गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने ‘चला येवा कोकण आपलोच असा आणि आता बोरिवली इथून गाडी आपल्याला मिळताच असा’ अशी कोकणी स्टाईलने साद घालत या गाडीची माहिती आमदार राणे यांनी दिली आहे.
आपण सगळेजण बोरिवली तर उत्तर मुंबईकर तसेच वसईपासून सुद्धा लोकांना त्या गाडीमध्ये चढता येईल. त्याची थांब्याची निश्चिती तिच्या वेळेची निश्चिती या सगळ्याची माहिती आपण पोहोचवू अशी ग्वाही आमदार राणे यांनी दिली आहे. ही गाडी सुरू झाल्याची माहिती देणारा व्हिडिओ आमदार सुनील राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
बोरिवलीमधून इतक्या व्यवस्थितपणाने या गाडीमधून आपण कोकणाकडे रवाना होऊ आणि आपला गणपती आपल्या सगळ्यांच्या गणपती उत्सव जवळ आला आहे. यामध्ये आपल्या घरी आपल्या कोकणाच्या अस्सल लाल मातीमध्ये आणि मराठी माणसाच्या हृदयामध्ये असलेल्या कोकणात आपण सगळे जाऊ आणि गणपती उत्सव साजरा करू. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा आपले उत्तर मुंबईचे खासदार यांचे मनःपूर्वक अभिनंदन कार्यक्रमाचं निमंत्रण आपल्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था आपण सगळेजण कर. विशेष करून उत्तर मुंबईत राहत असलेल्या कोकणवासियांसाठी ही खुशखबर आहे. आपण सगळ्यांनी याचा आनंद घ्या आणि या गाडीमधून प्रवास करा, असं आवाहन आमदार सुनील राणे यांनी केलं आहे. या गाडीची वेळ तिकीट बुकिंग कधीपासून सुरू होणार याची माहिती लवकरच रेल्वे प्रशासनाकडून दिली जाणार आहे.