Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गणेशोत्सवासाठी रेल्वे मंत्र्यांचा मोठा निर्णय, बोरिवलीमधून थेट कोकण गाठता येणार

6

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून एक आनंदाची बातमी आहे. बोरीवलीवरून थेट कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीकडे जाण्याकरता येत्या २३ ऑगस्टपासून नव्याने रेल्वे सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रयत्नामुळे हा मोठा निर्णय घेण्याची माहिती मुंबई येथील बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांनी दिली आहे. नवीन रेल्वेमुळे मुंबई येथील उपनगरात राहणार्‍या चाकरमान्यांची मोठी सोय होणार असून गेल्या कित्येक वर्षांची मागणी आता पूर्णत्वाकडे जात आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आलं असून आता थेट बोरवली ते सावंतवाडी असा प्रवास करता येणार आहे. ‘चला येवा कोकण आपलोच असा आणि आता बोरिवली इथून गाडी आपल्याला मिळताच असा’, अशी कोकणी स्टाईलने साद घालत या गाडीची माहिती आमदार राणे यांनी दिली आहे.२३ ऑगस्ट २०२४ रोजी बोरिवली इथून कोकणामध्ये जाण्यासाठी आपली कोकण रेल्वे सज्ज होत आहे. त्याचा पहिला कार्यक्रम हा बोरिवलीमधून कोकणाकडे जाणाऱ्या गाडीचा २४ ऑगस्टला सकाळच्या वेळेला होणार आहे. त्याच्याबद्दलची माहिती येणाऱ्या आणखी दोन-चार दिवसांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. संपूर्णपणाने उत्तर मुंबईतील कोकणी माणूस अनेक वेळेला आपण कोकणामध्ये राहत असताना, मुंबईमध्ये कामाला येत असताना किंवा मुंबईमध्ये राहत असताना आणि आपल्या गावाकडे जात असताना एक वेळेला इथून दादरला कधी इथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाईपर्यंत प्रचंड प्रमाणामध्ये वेळ होत असतो. अशा वेळेला बोरिवलीमधून कोकणाला जाण्यासाठी रेल्वे असावी ही मागणी कित्येक वर्षांची होती.
Milind Narvekar : उद्धव ठाकरेंचा वापर मित्रपक्ष प्रचारासाठी करुन घेतील, शिवसैनिकाचं मिलिंद नार्वेकरांना पत्र

बोरिवलीच नव्हे तर गोरेगाव अगदी वसईमधून जाणाऱ्यांना ही नवीन गाडी उपयुक्त ठरणार आहे. या गाडीमुळे मुंबईतील उपनगरांमध्ये राहणाऱ्या कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. निवडणुकीच्या आधी दिलेले आश्वासन कोकणवासीयांच्या वतीने दोन महिने आणि १३ दिवसांमध्ये त्यांनी ही गोष्ट जवळजवळ पूर्णत्वाला आणली त्याबद्दल विशेष करून केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे मनःपूर्वक अभिनंदन आमदार सुनील राणे यांनी केलं आहे. आपल्या गावाकडे कोकणाकडे गणपतीच्या उत्सवाच्या निमित्ताने ‘चला येवा कोकण आपलोच असा आणि आता बोरिवली इथून गाडी आपल्याला मिळताच असा’ अशी कोकणी स्टाईलने साद घालत या गाडीची माहिती आमदार राणे यांनी दिली आहे.

आपण सगळेजण बोरिवली तर उत्तर मुंबईकर तसेच वसईपासून सुद्धा लोकांना त्या गाडीमध्ये चढता येईल. त्याची थांब्याची निश्चिती तिच्या वेळेची निश्चिती या सगळ्याची माहिती आपण पोहोचवू अशी ग्वाही आमदार राणे यांनी दिली आहे. ही गाडी सुरू झाल्याची माहिती देणारा व्हिडिओ आमदार सुनील राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

बोरिवलीमधून इतक्या व्यवस्थितपणाने या गाडीमधून आपण कोकणाकडे रवाना होऊ आणि आपला गणपती आपल्या सगळ्यांच्या गणपती उत्सव जवळ आला आहे. यामध्ये आपल्या घरी आपल्या कोकणाच्या अस्सल लाल मातीमध्ये आणि मराठी माणसाच्या हृदयामध्ये असलेल्या कोकणात आपण सगळे जाऊ आणि गणपती उत्सव साजरा करू. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा आपले उत्तर मुंबईचे खासदार यांचे मनःपूर्वक अभिनंदन कार्यक्रमाचं निमंत्रण आपल्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था आपण सगळेजण कर. विशेष करून उत्तर मुंबईत राहत असलेल्या कोकणवासियांसाठी ही खुशखबर आहे. आपण सगळ्यांनी याचा आनंद घ्या आणि या गाडीमधून प्रवास करा, असं आवाहन आमदार सुनील राणे यांनी केलं आहे. या गाडीची वेळ तिकीट बुकिंग कधीपासून सुरू होणार याची माहिती लवकरच रेल्वे प्रशासनाकडून दिली जाणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.