मुंबईकरांना जलदिलासा! धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा, ३२ प्रमुख धरणांची जाणून घ्या स्थिती

म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सध्या राज्यभर पावसाने ओढ दिली असली तरी ऑगस्टच्या पंधरवड्यापर्यंत राज्यातील ३२ प्रमुख धरणांत सरासरीच्या १० टक्के अधिक जलसाठा आहे. केवळ जायकवाडी प्रकल्पात सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांजवळ साठा आहे. उर्वरित सर्व धरणांमधील जलसाठा ८० टक्के किंवा त्याहून अधिक असल्याने सध्यातरी समाधानकारक स्थिती असल्याचे केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

देशभरातील १५० प्रमुख धरणांवर केंद्रीय जल आयोगाकडून देखरेख ठेवली जाते. त्यामध्ये महाराष्ट्रातीलच सर्वाधिक ३२ धरणांचा समावेश आहे. या ३२ धरणांमध्ये जुलैअखेरीस सरासरीच्या पाच टक्के अधिक जलसाठा होता. तो साठा आता १० टक्क्यांवर गेल्याचे समाधानकारक चित्र आहे. जुलैअखेरीस जायकवाडी, भीमा (उजनी) व गिरणा या धरणांमधील जलसाठा सरासरीच्या ५० टक्क्यांहून कमी होता. सातारा जिल्ह्यातील उरमोडी व पुणे जिल्ह्यातील भीमा आस्खेड या दोन धरणांमधील साठा हा सरासरीच्या ५० ते ८० टक्क्यांदरम्यान होता. आता मात्र चित्र सकारात्मक आहे.
Weather forecast : पावसाची ओढ, उकाड्यात वाढ, महाराष्ट्राची काहिली; पुढील दोन आठवड्यासाठी IMD चा हवामान अंदाज काय?
आयोगाच्या शुक्रवार, १६ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार, राज्यातील या ३२ पैकी एकाही धरणात सरासरीपेक्षा ५० टक्क्यांहून कमी जलसाठा नाही. सरासरीच्या तुलनेत सर्वांत कमी साठा जायकवाडीमध्ये आहे. बहुतांश धरणे सरासरीच्या तुलनेत ८० ते ९० टक्के भरलेली आहेत. भीमा (उजनी), वीर ही धरणे सरासरीच्या १०० टक्के भरली आहेत. तर १३ धरणांमध्ये सरासरीच्या तुलनेत ९० टक्क्यांहून अधिक जलसाठा आहे.

राज्यातील प्रमुख धरणांची स्थिती अशी (स्रोत : केंद्रीय जल आयोग)

धरणे एकूण कमाल क्षमता (अब्ज घन मीटर) सध्या मागील वर्षी सरासरी सरासरीच्या तुलनेत

१९.१६६
१४.९४८
१३.३२७
१३.५७५
१०.११ टक्के अधिक

Source link

heavy rainMumbai DamsMumbaikarReservoir of Mumbaiwater storage in damsधरणांमधील पाणीसाठापावसाची कृपामुंबई बातम्यामुंबईकरांच्या पाण्याची चिंतामुंबईतील जलाशय भरले
Comments (0)
Add Comment