रत्नागिरीच्या कोषागार कार्यालयात काही वर्षांपूर्वी कार्यरत असलेले आणि सध्या वसई-विरार महानगरपालिकेचे मुख्य लेखा परिक्षक विनायक फासे हे १५ ऑगस्ट रोजी आपल्या कुटुंबासह फिरण्यासाठी रत्नागिरीत आले होते. शनिवारी दुपारी ते कुटुंबासमवेत आरे-वारे येथील समुद्र किनारी गेले होते. कुटुंब किनाऱ्यावर फिरत असतानाच त्यांचा मुलगा सिद्धार्थ हा गुडघाभर पाण्यात उतरला आणि याचवेळी मोठा घात झाला. मात्र, ही घटना जवळच असलेले प्रविंद्र बिरादार यांनी पाहिली व त्यांनी सिद्धार्थ याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. सिद्धार्थ वाचू शकला नाही पण याचवेळी बिराजदारही पाण्यात ओढले गेले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सिद्धार्थ आता ओढला जात होता. सिद्धार्थला वाचविताना प्रविंद्र बिरादार यांचा श्वास गुदमरु लागल्याने ते पाण्यात पडले.
या सगळ्या प्रकारामुळे कुटुंबीयांनी आरडाओरडा सुरू केला. हा सगळा प्रकार तात्काळ जीव रक्षकांच्या लक्षात आला. ही घटना येथील जीव रक्षकांना समजताच जीव रक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जीवाची बाजी लावून बिराजदार यांना वाचवलं. मात्र सिद्धार्थच्या नाका तोंडात पाणी गेल्याने तो वाचू शकला नाही. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यावा मृत घोषित केलं. प्रविंद्र बिरादार यांना पाण्याच्या बाहेर काढले त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेचे वृत समजताच पोलीस निरिक्षक नितिन ढेरे, पोलीस उपनिरिक्षक सौ.सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक संजय शिगवण यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात येऊन पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत युवक हा वसई-विरार महानगरपालिकेचे मुख्य लेखा परिक्षक विनायक फासे यांचा मुलगा आहे. विनायक फासे हे रत्नागिरी येथेही काहीवर्षे कार्यरत होते.