आता आगामी २५ ऑगस्टला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘लखपती दीदी’ कार्यक्रमानिमित्त महिलांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी भाजप पुर्ण तयारीला लागले आहे, अवघ्या आठवड्यावर आलेल्या कार्यक्रमासाठी सरकारी अधिकारी सुद्धा सभास्थळाची पाहणी करताना दिसत आहेत.
दोन वेळा पीएम मोदींचा जळगाव दौरा हुकला!
लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगावात दौरा होणार होता, शासनाने तयारी सुरु केली होती. विमानतळाच्या समोरील मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती. मंडप, खुर्च्या तसेच जमीन सपाटीकरणाचे काम जोरात सुरू होते, मात्र दोन वेळेस काही कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा होऊ शकला नाही. मात्र यंदा २५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याचे निश्चित केले आहे. यासाठी जळगाव विमानतळाच्या समोरील कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिलांना संबोधित करणार आहेत.
याच मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या संयुक्त सचिव स्वाती शर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाचे अधिकारी यावेळी उवस्थित होते