युतीतील मित्रपक्षाची कदमांच्या मतदारसंघावर नजर
भाजपाने उमेदवारीची मागणी करणे यामध्ये गैर नाही लोकशाही आहे. मात्र मला विश्वास आहे की दापोली मंडणगड खेड विधानसभेची उमेदवारी मलाच जाहीर होईल. मग त्यानंतर आम्ही महायुती म्हणून हातात हात घालून एकत्र काम करू असा विश्वास कदमांनी व्यक्त केला आहे. आपल्याबरोबर पालकमंत्री उदय सामंत, महाडचे आमदार भरत गोगावले आणि कोकणातले सगळे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत एकत्र आलो आहोत म्हणून आम्हाला काळजी नाही. रत्नागिरी जिल्ह्यात महायुती असतानाही भाजपाकडूनही उमेदवारीची मागणी होत आहे यावर बोलताना आमदार योगेश कदम यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंना संधी का नाही दिली?
शरद पवार यांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावेत मग आता महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री पदासाठीचे उद्धव ठाकरे यांचे नाव जाहीर का करण्यात आले नाही असाही सवाल करत आमदार योगेश कदम यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अगर न करावा पण पुन्हा एकदा आमची महायुतीची सत्ता येईल असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केला आहे.
महिलांनी शिवसेनेचे युवा नेते आमदार योगेश कदम यांना औक्षण करत केले रक्षाबंधन
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात शुभारंभ झाला. यावेळी उपस्थित महिला वर्गांनी समस्त महिला वर्गाच्या वतीने प्रतिनिधिक स्वरूपात पाच महिलांनी औक्षण करून आमदार योगेश कदम यांना रक्षाबंधन केलं. या कार्यक्रमात महिलांनी केलेल्या रक्षाबंधनाच्या स्नेहाने आमदार योगेश कदमही क्षणभर भारावून गेले, मला अगोदर माहिती असते तुम्ही राखी बांधणार आहात तर मी येताना गिफ्ट घेऊन आलो असतो अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. इतकंच नाही तर आपल्याला कार्यक्रमाला यायला उशीर झाल्याने त्यांनी उपस्थित महिलांची दिलगिरीही व्यक्त केली. पाच महिलांनी प्रातिनिधिक स्वरूपात शिवसेनेचे युवा नेते आमदार योगेश कदम यांना औक्षण करत रक्षाबंधन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.