जनतेचा कौल कोणाला?
महाविकास आघाडीच्या निवडणूकपूर्व सर्वेबद्दल विचारले असता राऊत म्हणाले, या सर्वेत ज्यांच्या जास्त जागा येतील हे दाखवले आहे. त्यांनी लढावे असे आमचे मत आहे. आमच्या सर्वेनुसार विदर्भातील ६२ जागा आमच्या बाजूने आहेत, असा आमचा सर्वे सांगतो. तुम्हाला आमच्या सर्वेवर काही आक्षेप असेल तर तिन्ही पक्षांनी संयुक्तपणे निर्णय घेत जगातील सर्वोत्कृष्ट सर्वे करणाऱ्या कंपनीकडून तो करून घ्यावा असा सल्लाही त्यांनी महाविकास आघाडीला दिला.
काँग्रेसचा विधानसभेसाठी प्लान काय?
विधानसभेच्या तोंडावर राज्यात काँग्रेसकडून सुद्धा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु झाली आहे. लोकसभेतील यशानंतर आता विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांसाठी चाचपणी सुरु झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीसोबत युतीमध्ये असणाऱ्या काँग्रेसला लोकसभेत जास्त जागा राज्यातून मिळाल्या होत्या. अशातच आता आगामी विधानसभेसाठी सुद्धा काँग्रेसने तयारीला लागले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अमरावतीत काँग्रेसची बैठक झाली.चेन्नीथला म्हणाले,आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट वाटप करताना मुंबईत बसून निर्णय घेतले जाणार नाही. स्थानिक नेत्यांना विचारात घेऊनच तिकीट वाटप केले जाईल. आता त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरुन काही जागांवर वाद होण्याची शक्यता आहे.