मुंबई : बहुचर्चित हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा ११.४७ किमी लांबीचा रस्ता वर्षभरापासून वापराविना आहे. या रस्ता तयार असला तरीही, महामार्गावरून बाहेर पडण्यासाठीचा आंतर-बदल (इंटरचेंज) थेट ५० किमी दूर खूटघर येथे आहे. महामार्गाचा हा पुढील ५० किमीपर्यंतचा रस्ता १०० टक्के तयार नसल्यानेच ११.४७ किमीचा भाग वापरता येत नाही. महामार्गावरील सर्वाधिक आव्हानात्मक व देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदादेखील याच भागात आहे. हा महामार्गाच्या पॅकेज १४चा भाग आहे.देशाची आर्थिक राजधानी व राज्याची उपराजधानी यांना जोडणारा समृद्धी महामार्ग आत्तापर्यंत इगतपुरी-नागपूर-इगतपुरी असा ६२५ किलोमीटर सुरू झाला आहे. आता इगतपुरी ते आमने (भिवंडी) या अखेरच्या ७६ किलोमीटरचे काम अंतिम टप्प्यात असून ते सप्टेंबरअखेर पूर्ण होणार आहे. या ७६ किमीमध्ये बांधकामाच्या पॅकेज १४च्या ९० टक्के भागासह पॅकेज १५ व पॅकेज १६चा समावेश आहे. नागपूर ते इगतपुरीपर्यंत बांधकामाच्या एकूण १३ पॅकेजचा समावेश आहे व १४व्या पॅकेजचा १० टक्के भाग आहे. त्यानुसार १४व्या पॅकेजचा ९० टक्के भाग वर्षभरापासून बांधून पूर्ण असला, तरीही तो अद्याप वापरात नाही.
बांधकामाच्या या १४व्या पॅकेजमध्ये इगतपुरी व कसारा यांना जोडणाऱ्या पिंपरी सद्रोद्दीन ते वशाला बुद्रुक, या दोन गावांदरम्यानच्या ७.७५ किमी लांबीच्या इंग्रजी ‘एस’ आकारातील व १८० मीटरचा उतार असलेल्या बांधकामादरम्यान आव्हानात्मक अशा बोगद्याचा समावेश आहे. याखेरीज ६० मीटर उंचीचा जवळपास १३०० मीटर लांबीच्या पुलाचाही यात समावेश आहे. बोगदा व पुलासह या पॅकेजमधील एकूण १३.१ किमीचा समृद्धी महामार्ग सप्टेंबर २०२३पासून बांधून पूर्ण आहे. मात्र त्यातील ११.५ किलोमीटरचा भाग वर्ष पूर्ण होत असले, तरीही अद्याप वापरात आलेला नाही.

दोष जबाबदारी कालावधी २५ टक्के संपला
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) कंत्राट करारानुसार, बांधकाम पॅकेज बांधून पूर्ण झाल्यानंतर चार वर्षे त्या रस्त्याची जबाबदारी कंत्राटदारावर असते. तो दोष जबाबदारी कालावधी (डीएलपी) असतो. चार वर्षांनुसार पॅकेज १४मधील ९० टक्के रस्त्याचा २५ टक्के डीएलपी कालावधी सरला आहे. ‘डीएलपी कालावधी मागील वर्षीच सुरू झाला असला, तरीही पॅकेज १४मधील काही भाग वापरात आहे. तसेच यादरम्यान देखभालीचा खर्च कंत्राटदारच करीत आहे. महामंडळ त्यासाठी खर्च करणार नाही’, असे एमएसआरडीसीच्या उच्चाधिकाऱ्यांनी याबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना स्पष्ट केले.