म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या जोडीला दिल्लीतून राज्य चालवू देऊ नका, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी राज्यातील नागरिकांना उद्देशून केले. तसेच महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील मजबूत सरकारची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे मंगळवारी षण्मुखानंद सभागृहात सद्भावना मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास काँग्रेसच्या नेत्यांव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.
‘भाजप विषापेक्षा कमी नाही. त्यामुळे त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राबाहेर फेकून दिले पाहिजे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना हुकूमशहा बनण्यापासून रोखल्यामुळे मी राज्यातील नागरिकांचे अभिनंदन करतो. भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळाले असते तर त्यांनी राज्यघटना बदलायला घेतली असती. परंतु हे संपलेले नाही. राज्यसभेचे खासदार निवडून आणण्यासाठी आणि राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी आमदारांची गरज आहे. राज्ये जिंकली नाहीत तर आपल्याला राज्यसभेचे खासदार निवडून आणता येणार नाहीत. राज्यसभेत आपल्याकडे बहुमत नसेल तर आम्ही राज्यसभेत घटनादुरुस्ती कशी थांबवू शकतो,’ असा प्रश्न खर्गे यांनी केला.

नेहरुंचे योगदान पुसता येणार नाही : शरद पवार
या देशाच्या स्वातंत्र्यानंतर एक नवी पिढी देश सावरण्यासाठी काँग्रेसचे नेतृत्व हातात घेऊन यशस्वी झाली, त्यात राजीव गांधींचा उल्लेख प्रकर्षाने करावा लागेल. त्यांचा जन्म मुंबईत झाला होता. हा दिवस मुंबईत साजरा होत आहे याचा मला आनंद आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले. संसदेत नेहरू कुटुंबावर टीका केली जाते. ज्यांनी आपले सर्वस्व देशासाठी दिले, चार पिढ्या देशासाठी दिल्या, अशा व्यक्तीच्या कुटुंबांबद्दल एक प्रकारची आकसाची भूमिका देशाचे पंतप्रधान आणि सहकारी घेतात हे दुर्दैवी आहे, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली. त्यांनी काहीही टीका केली तरी देशाच्या इतिहासातील नेहरू आणि त्यांच्या कुटुंबाचे योगदान कुणीही पुसू शकत नाही, असे ते म्हणाले. माणसे कळायला वेळ लागतो. राजीव गांधी कळायला वेळ लागला, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.