बोरिवली पूर्वेकडील टाटा पॉवर परिसरातील एका इमारतीमध्ये राहणाऱ्या फोटोग्राफरचे घर १३ ॲागस्ट रोजी फोडण्यात आले. त्याच्या घरातून महागडा लॅपटॉप चोरीला गेला. त्याने केलेल्या तक्रारीवरून कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
उपनिरीक्षक धीरज वायकोस, विजयेंद्र आंबवडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देउन सीसीटीव्ही फुटेज तपासले.त्यामध्ये काही तरुण एका ऑटो रिक्षाने येऊन इमारतीमध्ये जाऊन व काही वेळातच बाहेर पडून रिक्षाने निघून जाताना दिसले.
चोरांना असे पकडले.
पोलिसांनी रिक्षाचा क्रमांक प्राप्त करून रिक्षा मालकाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, उत्तर प्रदेश येथील बिजनौर जिल्ह्यातील काहीजण ५ ते ६ दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आले होते. त्यांनी रिक्षा वापरण्यासाठी घेतली होती. सखोल चौकशीत हे तरुण दिल्ली आरटीओ पासींग असणाऱ्या कारने उत्तर प्रदेशकडे गेल्याचे दिसत होते.
तांत्रिक पुराव्यांवरून त्यांची कार विक्रमगड-जव्हार, मोखाडा (जिल्हा पालघर) या मार्गाने जात असल्याचे दिसून आले. मोखाडा पोलिसांच्या मदतीने कस्तुरबा मार्ग पोलिसांनी कारमधील पाच आरोपीतांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले.
कुठून आली ही टोळी?
दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथून येऊन मुंबईत ठिकठिकाणी घरफोड्या करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींच्या अटकेमुळे घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
कोण होते चोर?
चौकशीत एजाज रमजानी अन्सारी, अमीर सोहेल शमीम अहमद, सलमान तस्लीम नदाफ, शकील इनामुल हक, शादाब अकबर हुसेन अशी नावे सांगणाऱ्या या आरोपींना बोरिवलीसह मुंबईत अन्य ठिकाणी गुन्हे केल्याचे समोर आले.