२०० कोटींची नुसती जाहिरात करता आणि राज्यात महिला मात्र सुरक्षित नाहीत, सुप्रिया सुळेंची टीका

दीपक पडकर, बारामती : सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन करत, दोन महिन्यांमध्ये महिला अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली त्याची माहिती द्यावी असे आव्हान दिले आहे. आम्ही तुमचा सत्कार करू असा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. राज्यांमध्ये २०० कोटी रुपयांची योजनेची जाहिरात करण्यापेक्षा महिला सुरक्षित कशा राहतील, याकडे सरकारने लक्ष द्यावे असा खोचक सल्ला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

गुरुवारी बारामतीत सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी त्यांनी वरील भूमिका मांडली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, बदलापूरच्या घटनेमध्ये संबंधित महिलेला इतका वेळ ताटकळत का ठेवले? हा प्रश्न अजूनही सरकारने विचारलेला दिसत नाही. रील्स करून नागपूरमध्ये पोलीस ठाण्यात नाचणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई होते, पण उपमुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या मतदार संघातच जे पोलीस, पोलीस ठाण्यामध्ये जुगार खेळतात त्यांच्यावर खरी कारवाई व्हायला हवी.
Badlapur Case Update: पोलीस-शाळा प्रशासनाची बंद दाराआड चर्चा; चिमुकलीच्या पालकांचा गंभीर आरोप; या एका व्यक्तीमुळे दाखल झाली तक्रार

लाडकी बहीणपेक्षा महिलांना सुरक्षित करण्याकडे लक्ष देण्याची गरज

सातारा, कोल्हापूर, बदलापूर, दौंड, अकोला अशा अनेक घटना सातत्याने घडत आहेत आणि गुन्हेगारीकरण वाढत आहे. यामुळे महिला या राज्यात सुरक्षित नाहीत. दीड हजार रुपयांच्या लाडकी बहीण योजनेपेक्षा त्या महिलांना सुरक्षित करण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आता लोकच म्हणू लागले आहेत, हे दीड हजार रुपये परत घ्या परंतु आमच्या लेकीबाळी सुरक्षित असल्या पाहिजेत, यावरूनच सुरक्षेचे महत्त्व सरकारला कळाले पाहिजे अर्थात मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट उशिरा लक्षात आली असे म्हणावे लागेल, असेही सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाल्या. दरम्यान, बदलापूर प्रकरणानंतर राज्यातील कायदा, सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी होत आहे. बदलापूर प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्याची मागणी होत आहे.

Source link

baramati newsSupriya Sulesupriya sule criticizes mahayuti in baramatiबारामती बातमीसुप्रिया सुळेसुप्रिया सुळेंची महायुतीवर टीका
Comments (0)
Add Comment