Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! नव्याने अर्ज दाखल केलेल्या महिलांना सप्टेंबर मध्ये ‘या’ योजनेचे तीन हप्ते मिळणार…

Ladki Bahin Yojana:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेने बुधवारी दोन कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला. राज्यातील २ कोटी ३ लाख ९४ हजार ९२४ महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असून या अर्जांची छाननी युद्धपातळीवर सुरू आहे. नव्याने अर्ज दाखल केलेल्या महिलांना सप्टेंबरमध्ये या योजनेचे तीनही हफ्ते मिळणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स
Ladki Bahin Yojana:लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! नव्याने अर्ज दाखल केलेल्या महिलांना सप्टेंबर मध्ये ‘या’ योजनेचे तीन हप्ते मिळणार…
मुंबई: महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेने बुधवारी दोन कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला. राज्यातील २ कोटी ३ लाख ९४ हजार ९२४ महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असून या अर्जांची छाननी युद्धपातळीवर सुरू आहे. नव्याने अर्ज दाखल केलेल्या महिलांना सप्टेंबरमध्ये या योजनेचे तीनही हफ्ते मिळणार आहेत.
धागा मायेचा, वीण विश्वासाची…! ‘रक्षाबंधन’निमित्त मुख्यमंत्री शिंदेंचा लाडक्या बहिणींसाठी खास लेख
राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. मागील आठवड्यातच या योजनेचा शुभारंभ करत जवळपास दीड कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे थेट पोहोचविण्यात आले. त्यानंतर या योजनेचे लाभ आपल्यालाही मिळावेत यासाठी महिलांकडून अर्ज केले जात आहेत.
Ladki Bahin Yojana : खात्यात ‘लाडकी बहिण’ योजनेचे पैसे जमा; आता राज्य सरकारचे बॅंकांना महत्वाचे आदेश
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे योजनांची माहिती देण्यासाठी हेल्पलाइन सुरू करताना योजनेला वाढत असलेल्या प्रतिसादाविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. आधी विरोधक प्रचार करत होते की, योजनेचे पैसे मिळणारच नाही. त्यानंतर जेव्हा खरंच पैसे थेट खात्यात आले तेव्हा हे पैसे काढून घेणार असा प्रचार सुरू झाला. मात्र, महिलांनी जेव्हा हे पैसे खात्यातून काढले तेव्हा साहजिकच ज्या महिलांच्या मनात संदेह होता त्यांनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे.
Shilpa Shetty : महिलांना दर महिन्याला आर्थिक हातभार लाभणार… शिल्पा शेट्टीकडून ‘लाडकी बहीण’ योजनेचे कौतुक

अडीच कोटींचे उद्दिष्ट

लाभार्थी महिलांची संख्या किमान अडीच कोटींपर्यंत नेण्याचा राज्य सरकारचा मानस असून त्यादृष्टीने अधिकाधिक महिलांना योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या वाढत्या संख्येविषयी महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनीही माहिती दिली. महाराष्ट्रातील २ कोटी ३ लाख ९४ हजार ९२४ महिलांनी योजनेसाठी अर्ज केला आहे. अर्जांची छाननी युद्धपातळीवर सुरू असून, प्रत्येक पात्र महिलेस लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे. विभागाकडून आधीच स्पष्ट करण्यात आले आहे की, आता पुढे ज्या महिला अर्ज करतील आणि योजनेसाठी पात्र ठरतील त्यांना जुलैपासूनचे सर्व हप्ते थेट बँक खात्यात मिळतील, असे त्या म्हणाल्या.

लेखकाबद्दलयोगेश बडे योगेश बडे हे ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नागपूर आवृत्तीत सीनियर डिजिटल कंटेन्ट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. गेल्या २० वर्षांपासून ते पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, सामाजिक, शेतकरी आत्महत्या, विदर्भाचे आंदोलन या विषयावर ते लिखाण करतात…. आणखी वाचा

Source link

Chief minister schemeladki bhain NewsMajhi Ladki bahintwo crore crossedदरमहा पंधराशे रुपयेमाझी लाडकी बहीण योजना
Comments (0)
Add Comment