Jalgaon : नेपाळ येथे झालेल्या अपघातातील २५ भाविकांचा मृतदेह घेऊन वायुसेना जळगाव विमानतळावर दाखल
सध्या मृतदेह वायुसेनेच्या विमानातून उतरवण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक नातेवाईकाला आत मध्ये बोलवून मृतदेहाची ओळख पटवून रुग्णवाहिका मध्ये ठेवण्यात येत आहे. काही घरातील चार सदस्य तर काही घरातील दोन,तीन, एक असे सदस्य मयत झाले आहेत. मृतदेह वरणगाव दिशेने नेण्यात येणार आहेत. यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री अनिल पाटील मदत व पुनर्वसन मंत्री गुलाबराव अनिल पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच स्थानिक आमदार उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या जळगाव दौरा असल्याने जिल्ह्यात मोठा पोलीस फौजफाटा लावण्यात आला आहे. तसेच बाहेरी देशातील वायुसेनेचे विमान असल्याने याच ठिकाणी आलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी देखील करण्यात येत आहे.
जळगाव विमानतळावर शोकाकूल वातावरण! २५ भाविकांचे मृतदेह दाखल, नातेवाईकांचा आक्रोश
कायदेशीर बाबांची पूर्तता करून प्रशासनाने नातेवाईकांच्या स्वाधीन मृतदेह दिले आहेत. यामध्ये एक मुलगी बेपत्ता असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली आहे. सर्व मृतदेहांवर वरणगाव आणि तळवेल येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.