ऑडिओ क्लिप ४ वर्षापूर्वीची आहे
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ” व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप ४ वर्षांपूर्वीची असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता तुम्ही चार-पाच वर्षांपूर्वीच्या ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप साऱ्या क्लिप मिळतील. आता सुपारी घ्यायचीच म्हटल्यावर सुपारी घेणारच ना. तुमचं नावच सुपारी ठाकरे आहे.” असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरेंनी माझा आवाज काढला
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, ” राज ठाकरे बदलापूरला का गेले नाही? माणुसकीच्या नात्याने त्यांनी २४ तासांच्या आत पोहोचायला हवं होतं. मराठी मनाचा अभिमान असणाऱ्या राज ठाकरे यांचा हात त्या मुलीच्या आणि तिच्या बापाच्या डोक्यावरून फिरायला हवा होता. परंतु ते माझ्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. मी जर म्हणालो की हा माझा आवाजच नाही तर हे लोक काय तपासायला जाणार आहेत? हा माझा आवाज नाही तो राज ठाकरे यांनीच काढला असेल. ते कोणाचाही आवाज काढतात. ते मोठे मिमिक्री आर्टिस्ट आहेत”. असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान, या ऑडिओ क्लिपमध्ये जितेंद्र आव्हाड हे मल्लिकार्जुन पुजारी यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. जाऊ दे, मरु दे तिला, तू कशाला बदनाम होतो? असा संवाद यात ऐकायला मिळाला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड आणि मनसेच्या आरोप प्रत्यारोपांमुळे दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता आहे.