बैठकीत काय चर्चा झाली?
हर्षवर्धन पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला आहे ते म्हणाले की, ” आज मी अडीच तास पवार साहेबांसोबत होतो.आज शरद पवारांसोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. बावनकुळे साहेब जेष्ठ नेते आहेत ते कोणत्या रेफरन्सने बोलले याची मला माहिती नाही. अद्याप पर्यंत मी कोणाच्या संपर्कात नाही. कोणी मला एप्रोच झालं नाही.एक गोष्ट खरी आहे की अजित पवारांचे दौरे चालू आहेत. चर्चा अशी आहे की ज्या तालुक्यात ज्याचा आमदार सीटिंग असेल त्याला तिकीट दिलं जाईल. त्यामुळे कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे की मी लढावं”.
फडणवीसांच्या निर्णयाची मी वाट पाहतोय
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की, ”लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार स्वतः म्हणाले की, देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याविषयी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. देवेंद्र फडणवीस हे मला म्हणाले की मी त्यासंदर्भातला निर्णय घेईल त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याची मी वाट पाहत आहे. तीन आठवड्यापूर्वी याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे चर्चा झाली ते म्हणाले निर्णय घेऊ. आम्ही कायमच लोकांच्यामध्ये असतो. आम्हाला तयारीची गरज नाही. देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय भूमिका घेतात हे बघू. मी लढावं हा कार्यकर्त्यांचा ,जनतेचा रेटा आहे. तो आवाज आहे आणि तो आवाज आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचलेला आहे. त्यांनी निर्णय घ्यावा. ते योग्य निर्णय घेतील.” असं म्हणत निर्णयाचा चेंडू हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात टोलावला आहे.