जितेंद्र खापरे, नागपूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. पटोले म्हणाले, मूर्तिकार आपटे हा आरएसएसचा माणूस आहे. आरएसएसच्या माणसाला मूर्ती घडवण्याचं काम देण्यामागचा उद्देश काय आहे? तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्यांना म्हणतात, की आम्ही राजकारण करतो, तर या कमिशन खोरीला कुठलं राजकारण म्हणायचं? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले म्हणाले, या सगळ्या कामात केंद्र सरकार असो कr राज्यसरकार असो दोघांनीही घाई केली आहे. सांस्कृतिक संचालय मंत्रालयाच्या माध्यमातून जे सर्टिफाइड करायला पाहिजे ते केलं गेलं नाही. त्यासाठी दोन्ही सरकार दोषी असल्याचं नाना पटोले म्हणाले. तसंच जो मूर्तिकार होता त्याला अनुभव नव्हता. अशा अनुभवहीन मूर्तिकारला ही मूर्ती बनवायला दिली. मर्तिकार आपटे हा आरएसएसचा माणूस आहे. आरएसएसच्या माणसाला मूर्ती घडवण्याचं काम देण्यामागे काय उद्देश आहे? शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे जे डोकं होतं त्यात त्यांनी कापड आणि कागद भरल्याची माहिती समोर आली असल्याचं नाना पटोले म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी असंही सांगितलं, की जसं पेशवाईंचा काळात शिवाजी महाराजांचा अपमान केला जात होता. या सरकारने जाणूनबुजून शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं धाडस दाखवलंच कस? हा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला आहे. कोट्यावधी पैसे खर्च करून महाराजांची प्रतिमा उभारली गेली आणि 8 महिन्यातच ती प्रतिमा कोसळते. त्यात केवळ मूर्तिकार आणि आर्किटेक्ट जबाबदार नाही, तर राज्य सरकारही जबाबदार आहे. त्यामुळे आम्ही डीजी यांना पत्र लिहून याबाबत दोन्ही सरकारवर गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे.
बदलापूर प्रकरण असो किंवा शिवाजी महाराजांचा पुतळा असो यावर फडणवीस सगळ्यांना म्हणतात, की आम्ही राजकारण करतो, तर या कमिशन खोरीला कुठलं राजकारण म्हणायचे, तुम्ही कमिशनखोर, जनतेचे पैसे तिजोरीतून लुटतात, महाराजांचा अपमान करत आहेत, तर याला कोणते राजकारण म्हणायचं असा सवाल ही नाना पटोले यांनी उपस्थित केला. हे राजकारण नाही आहे, हा स्वाभिमानाचा प्रश्न आहे. आणि स्वाभिमानाला ज्या ठिकाणी ठेच पोहोचते, त्या ठिकाणी मुखमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला राजकारण म्हणत असतील तर महाराष्ट्रातील जनता यांना पुढील निवडणुकीत खरं राजकारण दाखवतील.

पटोले पुढे म्हणाले, हे निवडणुका कधी घेतील हा प्रश्न आहे. १५ ऑगस्टला प्रधानमंत्री यांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ असा उल्लेख केला होता. हे प्रधानमंत्री देशातील चार विधानसभेच्या निवडणुका एकासोबत घेऊ शकत नाही, आपला सोयीने हे निवडणुका लावतात. वन नेशन वन इलेक्शन ही भूमिका मांडण्याचा अधिकार काय आहे? त्यामुळे या सर्व परिस्थितीच भाजप, केंद्र आणि राज्य सरकार राजकारण करत आहे.