मालवण पुतळा प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माफी; विरोधकांना म्हणाले-तुमचे सहकार्य हवे, आपण सर्वांनी मिळून…

Eknath Shinde Apologized On Statue Collapsed: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्याजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याप्रकरणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई: सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या घटनेविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली होती. आता मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे. त्याच बरोबर त्यांना राज्यातील सर्व विरोधी पक्षांना आवाहन देखील केले आहे.

मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळील छत्रपतींचा पुतळा पडल्यापासून राज्यभरात केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे. या पुतळ्या संदर्भात काल रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांनी बैठक देखील बोलवली होती. मात्र हे प्रकरण शांत होताना दिसत नाही. अशात मुख्यमंत्री शिदे यांनी माफी तर मागितली त्याच बरोबर सर्वांना आवाहन देखील केले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपली अस्मिता आहेत, ते आपली श्रद्धा आहेत, त्यामुळे यावरून विरोधकांनी राजकारण करू नये. आपण सर्वांनी मिळून शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा त्या ठिकाणी उभा करूयात. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

CM shinde apologized on statue collapsedMaharashtra politicsmaharashtra politics latest newsmaharashtra politics news in marathiShivaji Maharaj Statue Collapsedछत्रपती शिवाजी महाराजछत्रपती शिवाजी महाराज पुतळामुख्यमंत्री एकनाथ शिंदेराजकोट किल्ला
Comments (0)
Add Comment