आजचे पंचांग 1 सप्टेंबर 2024: शिवरात्री व्रत, तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

रविवार १ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर १० भाद्रपद शके १९४६, श्रावण कृष्ण चतुर्दशी उत्तररात्री ५-२१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आश्लेषा रात्री ९-४७ पर्यंत, चंद्रराशी: कर्क रात्री ९-४७ पर्यंत, सूर्यनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी

Maharashtra Times
राष्ट्रीय मिति श्रावण, शक संवत १९४६, श्रावण कृष्ण चतुर्दशी, रविवार, विक्रम संवत २०८१ सौर श्रावण मास प्रविष्टे १७, सफर २६, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १ सप्टेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, शरद ऋत. राहुकाळ सायंकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत

चतुर्दशी तिथी दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यानंतर अमावस्या तिथी प्रारंभ, आश्लेषा नक्षत्र रात्री ९ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर मघा नक्षत्र प्रारंभ, परिधियोग सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांपर्यंत त्यानंतर शिव योग प्रारंभ, विष्टी करण सायंकाळी ४ वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुष्पद करण प्रारंभ, चंद्र रात्री ९ वाजून ४९ मिनिटांपर्यंत दिवसरात्र कर्क राशीत त्यानंतर सिंह राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-२५
  • सूर्यास्त: सायं. ६-५२
  • चंद्रोदय: पहाटे ४-४५
  • चंद्रास्त: सायं. ६-०२

  • पूर्ण भरती: सकाळी ११-२५ पाण्याची उंची ४.१६ मीटर, रात्री ११-२६ पाण्याची उंची ३.६८ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ४-४४ पाण्याची उंची १.०० मीटर, सायं. ५-२९ पाण्याची उंची १.४८ मीटर
  • आजचे व्रत, सण: शिवरात्रि व्रत, अघोर चतुर्दशी

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २९ मिनिटे ते ५ वाजून १४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २८ मिनिटांपासून ते ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५८ मिनिटांपर्यंत ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ५ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून १० मिनिटांपासून ते १० वाजून ४५ मिनिटांपर्यत


आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून १ मिनिटांपासून ते ५ वाजून ५१ मिनिटांपर्यंत, भद्राकाळची वेळ सकाळी ५ वाजून ५९ मिनिटांपासून ते ४ वाजून २८ मिनिटांपर्यंत.


आजचा उपाय
पाण्यात जास्वंदीचे फुल घालून ते जल सुर्यदेवाला अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

1 september daily panchang1 सप्टेंबर दिनविशेष1 सप्टेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगशिवरात्री व्रत
Comments (0)
Add Comment