Maharashtra Politics: अब की बार मविआ सरकार, पण…; सर्व्हे आला, कोणाला किती जागा? कुठे आघाडी? कुठे पिछाडी?

Maharashtra Assembly Election Pre Poll Survey: विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने राहिले आहेत. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी जोरबैठका, दौरे सुरु आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची मोठी पिछेहाट झाली. त्यानंतर आता देशाचं लक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकडे लागलं आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी आघाडी महाविकास आघाडी यांच्यात जोरदार लढत अपेक्षित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू केली. महायुतीच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा राज्यात कितपत परिणाम होतो? महाराष्ट्रात आता निवडणुका झाल्या तर काय चित्र समोर येईल? मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची स्थिती काय असू शकते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून मिळाली आहेत.

राज्यातील ज्येष्ठ सेफोलॉजिस्ट दयानंद नेने यांनी १६ ऑगस्ट ते २५ ऑगस्टदरम्यान एक मोठं सर्वेक्षण केलं. लाडकी बहीण योजना महायुतीच्या बाजूनं कोणतीही मोठी लाट निर्माण करत नसल्याचं जन सर्वेक्षणातून समोर आलं आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांना महायुती आणि महाविकास आघाडीला लाईक आणि मतदान करण्यास सांगण्यात आले होते. राज्यात लाडकी बहीण योजना सुरू होऊनही जनमानसात कोणताही मोठा बदल झालेला नाही, हे सर्वेक्षणातून दिसून आलं आहे.
CMपदी कोण आवडेल? सर्व्हेचा निकाल चक्रावून टाकणारा; शिंदे, फडणवीस, ठाकरेंमध्ये चुरस; कोण पुढे?
महायुतीच्या कामगिरीबद्दल लोकांना विचारलं असता २८ टक्के लोकांनी चांगली, २० टक्के लोकांनी समाधानकारक, २० टक्के लोकांनी खराब, २१ टक्के लोकांनी असमाधानकारक, तर ११ टक्के लोकांनी माहिती नसल्याचं सांगितलं. जुलै अखेरच्या सर्वेक्षणात नेने यांनी महाविकास आघाडीला (एमव्हीए) १५८ तर महायुतीला १२२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली होती. आता दीड महिन्यानंतर झालेल्या दुसऱ्या सर्वेक्षणात अजूनही जनमानसात फारसा फरक नसल्याचं समोर आलं आहे.
भाजपच्या बैठकीला दांडी, पवारांच्या भिडूंच्या क्लबला हजेरी; बडा नेता लवकरच हाती घेणार तुतारी?
आज निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीला १५२ ते १५८ जागा मिळतील असा अंदाज आहे. राज्यात सत्तास्थापनेसाठी १४५ आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असं सर्व्हे असतो. तर महायुतीला १२२ ते १२३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महायुती चांगली लढत देताना दिसत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी लोकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना सर्वाधिक पसंती दिली आहे. दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आहेत.

Maharashtra Politics: अब की बार मविआ सरकार, पण…; सर्व्हे आला, कोणाला किती जागा? कुठे आघाडी? कुठे पिछाडी?

कोण कुठे आणि कोणत्या विभागात सामर्थ्यवान?
राज्यव्यापी सर्वेक्षणात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी तर उत्तर महाराष्ट्र, ठाणे, कोकण आणि पुण्यात महायुती मजबूत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईत महाविकास आघाडी पुढे असली तरी महायुती कडवी टक्कर देईल असं चित्र आहे. महायुतीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल. यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल. तर महाविकास आघाडीत काँग्रेसनंतर शिवसेना उबाठा आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस असेल.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

maharashtra assembly electionmaharashtra election surveyMaharashtra politicsVidhan Sabha Nivadnukभाजपमहाराष्ट्र राजकारणमहाराष्ट्र राजकीय बातम्याराष्ट्रवादी काँग्रेसविधानसभा निवडणूक सर्व्हेशिवसेना
Comments (0)
Add Comment