Ajit Pawar On Supriya Sule: बारामतीत जनसन्मान यात्रेत बोलताना अजित पवार यांनी विरोधी गटात असलेल्या पवार कुटुंबातील सदस्यांवर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळेंवरही टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची आज बारामतीत जनसन्मान यात्रा आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. त्यांच्या समवेत खासदार सुनील तटकरे, खासदार सुनेत्रा पवार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, अजित पवारांचे पुत्र जय पवार पार्थ पवार ही यावेळी उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळेंवर जळजळीत टीका…
मी सकाळी उठतो मग दूधवालाही सकाळी लवकर उठतो. सामान्य लोक लवकर उठतात. ते कुठ लोकांना सांगत सुटतात. तुम्ही लवकर उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे. तिला चहा करावा लागतो, असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. हाच धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राजकीय स्वरूपाच्या टीका टिपणी टाळून. विकासावरच बोलायचं असं मी ठरवलं आहे.
तसंच कार्यकर्त्यांनी ही ठरवा. विरोधक काय काय बोलतात..? त्यांना बोलू द्यात..त्याने अंगाला भोके पडत नाहीत. काही जण सांगतात की, आम्ही कुठे म्हणतो सकाळी लवकर उठा.. दूधवालाही सकाळी लवकर उठतो. यावर अजित पवार म्हणाले की, आम्ही कुठे म्हणतो दुपारी उठतो. मी असं म्हटलं नाही. आपण गोष्टींना महत्त्व देऊ नका. आपण इतका विकास केला आहे की.. तो घरोघरी पोहोचवा असं म्हणत नाव न घेता..खासदार सुप्रिया सुळेंवर टीका केली.