Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

त्यांना बोलू द्यात..त्याने अंगाला भोके पडत नाहीत; अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर जळजळीत टीका

8

Ajit Pawar On Supriya Sule: बारामतीत जनसन्मान यात्रेत बोलताना अजित पवार यांनी विरोधी गटात असलेल्या पवार कुटुंबातील सदस्यांवर निशाणा साधला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळेंवरही टीका केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
बारामती (दीपक पडकर ) : “काही काही” जण म्हणतात की दादा.. आता जरा वेगळच बारामती मध्ये वाटत आहे. तेव्हा त्याला मी म्हणालो की का रे.. म्हटले पूर्वी पवार कुटुंबातील सदस्य एवढी घरी काय येत नव्हते.. मात्र आत्ता लईच पवार घरी यायला लागलीत.. आणि विचारपूस करायला लागली आहेत. गेली तीस-पस्तीस वर्षात कोणी घरी आले नाहीत. आणि आता घरी येऊन म्हणतात की काय रे बाबा तुझं कसं आहे बर आहे का..? मी त्याला म्हटलं अरे बरं झालं ना..तुम्हाला पण आनंद होतोय.. की पवार फक्त मतं मागत होती.. आता घरोघरी, दारोदारी फिरायला लागली आहेत..सगळीचही पण फिरायला लागली आणि ती पण फिरायला लागली.. हरकत नाही शेवटी तो तुमचा मान आहे.. तुम्ही ठरवायचं आहे काय करायचं आणि काय नाही..? असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी गटातील पवार कुटुंबातील सदस्यांवर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची आज बारामतीत जनसन्मान यात्रा आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. त्यांच्या समवेत खासदार सुनील तटकरे, खासदार सुनेत्रा पवार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, अजित पवारांचे पुत्र जय पवार पार्थ पवार ही यावेळी उपस्थित होते.
Violence Against Women: ‘कट कट कट’ डायरेक्ट कटिंग करून टाकायची, याशिवाय नराधम सरळ होणार नाहीत; अजित पवार पुन्हा बोलले

खासदार सुप्रिया सुळेंवर जळजळीत टीका…

मी सकाळी उठतो मग दूधवालाही सकाळी लवकर उठतो. सामान्य लोक लवकर उठतात. ते कुठ लोकांना सांगत सुटतात. तुम्ही लवकर उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे. तिला चहा करावा लागतो, असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. हाच धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राजकीय स्वरूपाच्या टीका टिपणी टाळून. विकासावरच बोलायचं असं मी ठरवलं आहे.
फडणवीसांनी अभ्यास करून बोलावे; लाडकी बहीण योजनेच्या विरोधात याचिका करणाऱ्या वडपल्लीवारांनी दिले उत्तर
तसंच कार्यकर्त्यांनी ही ठरवा. विरोधक काय काय बोलतात..? त्यांना बोलू द्यात..त्याने अंगाला भोके पडत नाहीत. काही जण सांगतात की, आम्ही कुठे म्हणतो सकाळी लवकर उठा.. दूधवालाही सकाळी लवकर उठतो. यावर अजित पवार म्हणाले की, आम्ही कुठे म्हणतो दुपारी उठतो. मी असं म्हटलं नाही. आपण गोष्टींना महत्त्व देऊ नका. आपण इतका विकास केला आहे की.. तो घरोघरी पोहोचवा असं म्हणत नाव न घेता..खासदार सुप्रिया सुळेंवर टीका केली.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.