मुंबईत ठाकरेंचाच आव्वाज? मविआची सरशी, महायुतीला मतं नाहीत फारशी, धोक्याची घंटा वाजवणारा सर्व्हे

Maharashtra Vidhan Sabha Election Survey : मुंबईत महाविकास आघाडीला ३६ पैकी २१ विधानसभा मतदारसंघात विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई : विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती आपले सरकार टिकवण्यास उत्सुक आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांना महाविकास आघाडीला सरकारमध्ये कमबॅक करायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करत महायुती सरकारने महिला मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्येष्ठ सेफोलॉजिस्ट दयानंद नेने यांनी १६ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या काळात एक व्यापक सर्वेक्षण केले आहे. यानुसार लाडकी बहीण योजना महायुतीच्या बाजूने विजयाची मोठी लाट निर्माण करत नसल्याचे दिसते.

जनता काय म्हणते?

सर्वेक्षणात महायुतीच्या कामगिरीबद्दल विचारले असता, २८ टक्के जनतेने ती चांगली असल्याचे मत नोंदवले आहे, २० टक्क्यांनी समाधानकारक आहे, तर २० टक्के जनतेने खराब असल्याचं म्हटलं आहे, २१ टक्क्यांनी कामगिरी असमाधानकारक आहे, तर ११ टक्के लोकांनी माहिती नाही असे उत्तर दिले आहे.
हायकमांडचा होकार, काँग्रेसकडून विधानसभेचे ६ उमेदवार जाहीर, पाच जागांवर मैत्रीपूर्ण लढतही ठरली

दीड महिन्यात आकडे स्थिर

जुलै अखेरीस दयानंद नेनेंनी केलेल्या सर्वेक्षणात महाविकास आघाडीला १५८ तर महायुतीला १२२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आता दीड महिन्यानंतर झालेल्या दुसऱ्या सर्वेक्षणात अजूनही जनमानसात फारसा फरक झाला नसल्याचे समोर आले आहे. मविआच्या जागा सहाने घटून १५२ वर आल्या आहेत, मात्र महायुती अवघ्या एकाने वाढून १२३ वरच पोहोचली आहे.

मुंबईत ठाकरेंचाच आव्वाज? मविआची सरशी, महायुतीला मतं नाहीत फारशी, धोक्याची घंटा वाजवणारा सर्व्हे

मुंबईत महाविकास आघाडीचा आवाज

मुंबई आणि लगतच्या ठाणे, पालघर, तसेच पुणे यासारख्या जिल्ह्यांचा विचार करता आश्चर्यकारक आकडे समोर आले आहेत. मुंबईत महाविकास आघाडीला ३६ पैकी २१ विधानसभा मतदारसंघात विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महायुतीला अवघ्या १५ च जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच मुंबई ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचीच राहण्याचे संकेत मिळतात.
देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का, समर्थक भाजप सोडण्याच्या तयारीत, काँग्रेस प्रवेशाचे संकेत

ठाणे-पुण्यात काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात महायुती आघाडी घेत १८ पैकी १२ जागा जिंकू शकते. तर मविआला पाच आणि इतरांच्या वाट्याला एक जागा येऊ शकते. पालघरमध्ये महायुतीचा सुपडा साफ होऊ शकतो. मविआ दोन, तर इतर चार जागा जिंकू शकतात. यात माकप किंवा बविआचा समावेश असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यात २१ पैकी १६ जागांवर महायुतीला यश मिळण्याची चिन्हं आहेत. तर मविआला ५ जागा मिळू शकतात.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

ajit pawarDevendra FadnavisEknath Shindemaharashtra assembly election 2024Maharashtra Assembly PredictionMaharashtra Vidhan Sabha SurveymahayutiUddhav ThackerayVidhan Sabha Nivadnukउद्धव ठाकरे शिवसेना आमदारमविआ विरुद्ध महायुतीमहाराष्ट्र निवडणूक सर्वेक्षण अंदाजमहाविकास आघाडीविधानसभा निवडणूक सर्व्हे
Comments (0)
Add Comment