Ganeshotsav Konkan Railway Timetable: कोकणात जाणाऱ्या रेल्वेचं आरक्षण पूर्ण झाले आहे. यामुळे विघ्नहर्त्याचे स्वागत करण्यासाठी खरेदी आणि गावी निघालेल्या मुंबईकरांना प्रवासात त्रास सहन करतच जावे लागणार आहे.
हायलाइट्स:
- गणेशोत्सावाच्या आधीच प्रवाशांच्या पदरी निराशा
- पण कोकण आणि मध्य रेल्वेचा मोठा निर्णय
- विशेष अनारक्षित रेल्वेगाडीची घोषणा
गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष अनारक्षित रेल्वेगाडीची घोषणा कोकण आणि मध्य रेल्वेने केली आहे.
१) गाडी क्र. ०११०३ / ०११०४ मुंबई सीएसएमटी – कुडाळ – मुंबई सीएसएमटी विशेष (अनारिक्षित):
गाडी क्रमांक ०११०३ मुंबई सीएसएमटी – कुडाळ विशेष (अनारिक्षित)
सीएसएमटी येथून ४ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल. कुडाळला गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११०४ कुडाळ – मुंबई सीएसएमटी विशेष (अनारिक्षित)
-कुडाळ येथून ५ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी पहाटे ०४:३० वाजता सुटेल आणि सीएसएमटीला त्याच दिवशी दुपारी ४.४० वाजता पोहोचेल.
थांबे – दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामठे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, आणि सिंधुदुर्ग.
डबे – एकूण २० = सामान्य – १४ डबे,स्लीपर – ०४, एसएलआर -०२
प्रवास कसा करायचा ?
मुंबईहून कोकणात जाण्यासाठी रेल्वे-एसटींचे आरक्षण पूर्ण झाल्याने प्रवाशांकडून खासगी बसकडे विचारणा सुरू झाली आहे. खासगी बस चालकांकडून एसटीच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट भाड्यांची आकारणी होत असल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या गर्दीचा हंगाम असल्याचे सांगत बस चालकांकडून तिकीट दर वाढीला समर्थनच देण्यात येत आहे. एसटी नाही, रेल्वे नाही, खासगी गाडीचे वाढीव दर परवडत नाही, मग उत्सव काळात प्रवास कसा करायचा, असा प्रश्न प्रवाशांचा आहे